घरराजकारणमहापालिका निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले...

महापालिका निवडणुकांबाबत चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले…

Subscribe

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत होतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले आहे.

कोरोना काळापासून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यातील या रखडलेल्या निवडणुका लवकरच होतील, असे संकेत भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी दिले आहेत. त्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. BJP leader Chandrakant Patil has stated that the municipal elections in the state will be held by October

मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत होतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्यावरुन सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. यासंबंधीचे कायदेशीर समस्या मे महिन्यांपर्यंत निकालात निघू शकतात. सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी पालिकांच्या निवडणुकांच्या प्रकरणावर निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईळ. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर निवडणुक प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबर महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: ‘रोशनी तुमची बहीण आहे, तिचा FIR नोंदवायला सांगा’, शिंदेंच्या ‘त्या’ पत्रावर आव्हाडांचा संताप )

- Advertisement -

महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच?

सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारची वाॅर्डरचना मान्य केली तर कदाचित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईलही. पण 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे निवडणुका आयोग त्या दोन टप्यांत घेऊ शकतं, काही पावसाळ्याआधी आणि काही पावसानंतर… दुसरी शक्याता म्हणजे जर शिंदे सरकारची वाॅर्डरचना न्यायालयाने मान्य केली तर मग नव्याने प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगाला काही काळ लागेल. त्यामुळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यात आहे. मुंबई- पुण्यासारख्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -