घरराजकारणगुजरात निवडणूकमोदींच्या गुजरात मॉडेलला लोकांनी स्वीकारले, निवडणूक निकालावरून प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया

मोदींच्या गुजरात मॉडेलला लोकांनी स्वीकारले, निवडणूक निकालावरून प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया

Subscribe

अहमदाबाद – गुजरातमध्ये भाजपाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. काँग्रेस आणि आपला धोबीपछाड करत भाजपाने मुसंडी मारली आहे. मोदींनी गुजरातसाठी आणलेल्या गुजरात मॉडेलला लोकांनी स्वीकारल्यामुळेच भाजपाला यश मिळाला असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपा आघाडीवर आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणारे असल्याचे संकेत आहेत. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०००-२००१ मध्ये आणलेल्या गुजरात मॉडेलला द्यावं लागेल, असं प्रल्हाद जोशी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Gujarat Election Result Live Update : विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदी – सी. आर. पाटील

२०००-२००१ मध्ये नरेंद्र मोदी यांनी आणलेलं गुजरात मॉडेलला पसंती मिळाली असून ते स्वीकारलं गेलं आहे. देशासमोर सादर केलेलं या मॉडेलला लोकांच्या पसंतीस पडलं आहे. गुजरातवासीयांचे, गुजरात भाजपाचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा रेकॉर्ड आहे, असं प्रल्हाद जोशी म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, गुजरातवर भाजपाचीच सत्ता कायम राहिल्याने भाजपाच्या कार्यालयांबाहेर जल्लोष साजरा केला जातोय. ठिकठिकाणी पारंपरिक नृत्य करून कार्यकर्त्यांकडून उत्साह साजरा केला जातोय. गेल्या सहा टर्मपासून भाजपाची गुजरातवर एकहाती सत्ता आहे. सातव्या टर्ममध्येही भाजपाने एकहाती विजय मिळवला असल्याने कार्यकर्त्यांपासून नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


गुजरातमध्ये मिळालेल्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं कौतुक भाजपा गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी केलं आहे. नरेंद्री मोदींनी इथे प्रचार फेऱ्या घेतल्या, त्यामुळे भाजपाला विजय मिळवता आला. मोदींनी सर्वसमावेश विकास घडवून दाखवला. तसंच, या विजयासाठी गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार, असं सी.आर. पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -