हिमाचलमध्ये आमदार फुटण्याची भीती, काँग्रेस अलर्ट मोडवर

अटितटीच्या लढाईमुळे ऑपरेशन लोटस भाजपकडून राबवण्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे गोवा निवडणुकीमध्ये जे झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी काँग्रेस अलर्ट मोडवर आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे लक्ष आहे.

himachal pradesh election 2022 result congress on high alert about mla after win

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची वाताहात झाली असल्याचे दिसत आहे. गुजरातमध्ये काँग्रसला धक्का बसला असला तरी हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निवडणूक झाल्यावर लगेच विजयी उमेदवारांना दुसऱ्या राज्यात हालवण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत. भाजप नेते आणि निवडणूक प्रभारी विनोद तावडे आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी हिमाचलमध्ये दाखल झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेस सत्ता मिळवण्यात यशस्वी वाटचाल करत असल्याचे सध्याच्या निकालाच्या कलानुसार दिसत आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस ३९ तर भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे. आपने अद्याप खाते खोलले नसून इतर पक्ष ३ जागी आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. तर हिमाचलमध्ये अटी तटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. अटितटीच्या लढाईमुळे ऑपरेशन लोटस भाजपकडून राबवण्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे गोवा निवडणुकीमध्ये जे झाले ते पुन्हा होऊ नये यासाठी काँग्रेस अलर्ट मोडवर आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे लक्ष आहे.

काँग्रेसकडून विजयी आमदारांना दुसऱ्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी काही प्रमुख नेत्यांना आमदारांना घेऊन जाण्याची जबाबदारी दिली आहे. सर्वच राज्यात आता आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी काळजी घेण्यात येते.

विनोद तावडे शिमलामध्ये दाखल

भाजप नेते आणि हिमाचल प्रदेशचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे शिमल्यात दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस करणार का? अशी शक्यता आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु करण्यात येऊ शकतात. विनोद तावडे हिमाचलमध्ये बैठका घेत असून काय चर्चा होतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

हिमाचलमध्ये भाजप पिछाडीवर

हिमाचल विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीला दोन्ही पक्षांमध्ये समान आघाडीवर होते. तर आता काँग्रेस ३९ , भाजप २६ आणि इतर ३ जागी आघाडीवर आहे. हिमाचलमध्ये ६८ जागांवर निवडणुका होत असून सत्ता स्थापनेसाठी ३५ आमादारांचे संख्याबळ हवं आहे.


हेही वाचा : गुजरात आणि हिमाचलमधील 2017च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय सांगतात? वाचा सविस्तर