घरराजकारणउद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा दावा केला आहे. राज्यात सध्या राजकीय उलथापालथ होत असल्याचं दिसून येत आहे. आता यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण अशक्य असल्याचं म्हणत हे सरकार स्थिर आहे, असं स्पष्ट केलं आहे. ते मुंबई तकशी बोलत होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा दावा केला आहे. राज्यात सध्या राजकीय उलथापालथ होत असल्याचं दिसून येत आहे. आता यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण अशक्य असल्याचं म्हणत हे सरकार स्थिर आहे, असं स्पष्ट केलं आहे. ते मुंबई तकशी बोलत होते. ( It is impossible for Uddhav Thackeray to become Chief Minister again devendra Fadnavis said clearly )

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचे माझे भाकीत सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे ह सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहतली, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

- Advertisement -

योग्य निकाल लागेल- फडणवीस

उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे. त्यांच्या हे लक्षात आले असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यांचे सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकिल आहे, हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की निकाल योग्य पद्धतीने लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

( हेही वाचा: चंद्रकांत पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप )

- Advertisement -

काॅंग्रेस- राष्ट्रवादीचे किती आमदार संपर्कात?

मुंबई येणाऱ्या विधानसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादी -काॅंग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्रई देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. फडणवीस म्हणाले की, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेकजण संपर्कात आहोत. गेल्या पाच वर्षात अनेकजण आमच्याकडे आले. संपर्काच नात्यामध्ये परिवर्तन निवडणुकीवेळी होतं. आमच्या संपर्कात अजूनही अनेक आमदार आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत तिथे आम्ही अजूनही पोहोचलेले नाही. त्यामुळे तिथेही पोहोचालयला मिळाले तर चांगलच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -