घरराजकारणपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी उपनगर जिल्हा नियोजन समितीवर म्हात्रे, सरवणकर यांची वर्णी

पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी उपनगर जिल्हा नियोजन समितीवर म्हात्रे, सरवणकर यांची वर्णी

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात दाखल झालेल्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांची वर्णी आता वेगवेगळ्या समित्यांवर लावण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर तर श्रीकांत सरमळकरांचे पुतणे कुणाल सरमळकर यांची वर्णी लागली आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यावर तारखांवर तारखा मिळत आहेत. परिणामी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेषत:, शिंदे गटातील आमदारांचा याबाबतीत केव्हाही धीर सुटण्याची चिन्हे आहेत. त्यातच मुंबई महापालिकेसह विविध महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. मुंबई महापालिकेत गेल्या जवळपास 25 वर्षांपासून असलेली शिवसेनेची सत्ता खाली खेचून मुंबई मनपा ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यांना यासाठी शिंदे गटाची देखील साथ आवश्यक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – देशात जूननंतर आर्थिक मंदीची शक्यता, जी-२० परिषदेच्या उद्घाटनानंतर राणेंचं सूचक विधान

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला टि्वटर तसेच अन्य माध्यमांतून शीतल म्हात्रे यांच्याकडून लक्ष्य केले जाते. त्याचप्रमाणे आमदार सदा सरवणकर यांनी प्रभादेवी मतदारसंघात ठाकरे गटाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अशा नेत्यांना सांभाळणे गरजेचे असल्याने शिंदे गटाकडून शीतल म्हात्रे आणि समाधान सरवणकर यांना जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेले श्रीकांत सरमळकर यांचे पुतणे कुणाल सरमळकर यांना वांद्र्याचे विभागप्रमुखपद बहाल करतानाच त्यांना नियोजन समिती सदस्यत्वाची बक्षिसी देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीतील सदस्य
समाधान सरवणकर, रश्मी भोसले, किशोर जाधव, विजय कोरगावकर, कुणाल सरमळकर, अजय देसाई, अल्ताफ पेवेकर, रामप्रसिद्ध दुबे, शीतल म्हात्रे

हेही वाचा – कॉन्क्रिटीकरणामुळे मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांचा भडिमार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -