घरमहाराष्ट्रकॉन्क्रिटीकरणामुळे मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांचा भडिमार

कॉन्क्रिटीकरणामुळे मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांचा भडिमार

Subscribe

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा व मुंबई महानगर पुढील एक वर्षात खड्डेमुक्त करण्याच्या दृष्‍टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यावरून माजी मंत्री आणि युवानेता आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासन आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. आज पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंनी दहा प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक राज्य आहे. स्थायी समिती, लोकप्रतिनिधी नसल्याने सर्व निर्णय राज्य सरकारच्या सहकार्याने पालिका प्रशासनाकडून घेतले जातात. मात्र, या ४०० किमीच्या रस्त्याचा प्रस्ताव कोणी मांडला हा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच, साडेसहा हजार कोटींचा प्रस्ताव कोणी मंजूर केला? एवढा मोठा प्रस्ताव मान्य करताना स्थायी समिती, लोकप्रतिनिधी नव्हते. तरीही प्रशासकाने हा मोठा निर्णय घेतला, यावरही आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढले. हा मुंबईतील सर्व नगरसेवकांचा अपमान असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण वाढत आहे. या ४०० किमीच्या रस्त्यांमुळे कॉन्क्रिकिटीकरण वाढणार आहे. मुंबईचा जोशीमठ झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल करत कोणत्याही शहरात एवढं कॉन्क्रिकिटीकरण होत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

400 किमीच्या साडेसहा हजार कोटींच्या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दहा प्रश्न उपस्थित केले आहेत. हे दहा प्रश्न आदित्य ठाकरेंनी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्राद्वारेही पाठवले आहेत. ते दहा प्रश्न कोणते ते पाहुयात.

- Advertisement -
  1. ४०० किमीच्या रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला?
  2. साडेसहा हजार कोटी कोणी मंजूर केले? प्रशासकाने स्वतः मंजूर करणं कितपत योग्य?
  3. बजेटमध्ये हा निधी कसा दाखवणार?
  4. कामासाठी डेडलाईन ठरवली का? पाच ते सहा वर्षांचं काम एकावेळीच तर होणार नाही?
  5. कॉन्क्रिटीकरण करताना वाहतूक पोलिसांची परवानगी घेतली का?
  6. एसओआर का बदलला?
  7. कॉन्क्रिटीकरणामुळे मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण?
  8. कंत्राटदारांनी देशस्तरावर काम केलं असेल तर त्यांचा मुंबईसारख्या शहरांत काम करण्याचा अनुभव आहे?
  9. VJTI आणि IIT मधून कामाचा दर्जा तपासणार
  10. कोणत्या मैत्रीचा फायदा उचलून निविदा मंजूर झाली?

गद्दारांची टोळी अल्पायुची टोळी आहे. मात्र, राजकारण, समाजकारण, शहराची स्थिती दिर्घकाळ राहणार आहे.
२५ वर्षांपूर्वी महानगरपालिका सत्तेत आली तेव्हा पालिका कर्जात होतील. पालिकेची स्थिती आता चांगली आहे. पण सध्या पालिकेत गैरवर्तन सुरू आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन, आर्थिक बेशिस्तीमुळे पालिकेला एफडी तोडावी लागेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत जे होतंय ते तुम्हाला पटतंय. कधीही असं घडलं नाही ते असं घडतंय. त्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवकांनी भूमिका मांडावी, असं आवाहनही आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -