घरराजकारण'गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू'सदा सरवणकरांच्या बंडखोरीनंतर विनायक राऊतांचं भाष्य

‘गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू’सदा सरवणकरांच्या बंडखोरीनंतर विनायक राऊतांचं भाष्य

Subscribe

काहींनी गद्दारी जरी केली असली तरी अशी गद्दारी पक्षाने यापूर्वी देखील पचवली आहे. पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती राऊतांनी दिली

सेनाआघाडीचे पदाधिकारी आणि युवासेनेचे पदाधिकारी नगरसेवकांची सेनाभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली दरम्यान या बैठकीत कोणत्या मुद्यावर चर्चा करण्यात आली यासंदर्भात देखील राऊतांनी भाष्य केलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाअंतर्गत माहिम विधानसभा मतदार संघातील शिवसेना शंभर टक्के कायम आहे मजबूतीने काम करतेय. दरम्यान काहींनी गद्दारी जरी केली असली तरी अशी गद्दारी पक्षाने यापूर्वी देखील पचवली आहे. पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती राऊतांनी दिली

माहिम विधासभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. दुर्भाग्याने मात्र या संघातील आमदार सदा सरवणकर यांनी गद्दारी केली. मात्र शिवसेनेची संघटना आजही सक्षम आहे. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षामधून कोणीच जाणार नाही. दरम्यान, मविआ मधून आम्ही माघार घ्यायाला तयार आहोत पण समोर येऊन चर्चा करा असं वक्तव्य केलं यावर विनायक राऊतांना प्रश्न विचारला असता राऊतांनी विचारपूर्वक वक्तव्य केलंय तसेच भाष्य करणं देखील टाळलं आहे. संजय रऊतांनी विचारपूर्वक वक्तव्य केलं असेलं अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर खुद्द सदा सरवणकर यांनी सेनाभवनासमोर शक्ती प्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाविरोधात भाष्य केलं मात्र यानंतर सरवणकर स्वत शिंदे गटात जाऊन बसल्याने माहिम विभागातील अनेक शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

एकनाथ शिंदेंकडे संख्याबळ किती

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत जवळपास ३७ आमदार गुवाहटीमध्ये नेले आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत १७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण खळबळ माजली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –  अशा छोट्या-मोठ्या घटना होत राहतात, शिंदेंच्या बंडखोरीवर भुजबळांची प्रतिक्रिया

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -