घररायगडअलिबागमध्ये सरपंचपदासाठी ३५ तर सदस्यांसाठी १५८अर्ज

अलिबागमध्ये सरपंचपदासाठी ३५ तर सदस्यांसाठी १५८अर्ज

Subscribe

अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास मोठी गर्दी केली होती. सहा सरपंचपदांसाठी आतार्यंत एकुण ३५ अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे ४६ सदस्यपदांच्या जागांसाठी . आतापर्यंत तब्बल १५८ अर्ज सादर करण्यात आले आहेत.

अलिबाग: ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. सर्व्हरडाऊनमुळे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाल्याने अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यास मोठी गर्दी केली होती. सहा सरपंचपदांसाठी आतार्यंत एकुण ३५ अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे ४६ सदस्यपदांच्या जागांसाठी . आतापर्यंत तब्बल १५८ अर्ज सादर करण्यात आले आहेत.

तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी आतापर्यंत एकुण सात अर्ज दाखल झाले आहेत. तर सदस्य पदासाठी एकुण २३ अर्ज दाखल झाले आहेत. शिरवलीमध्ये सरपंचपदासाठी १०, तर सदस्य पदासाठी ३४ अर्ज दाखल झालेत. वैजाली ग्रामपंचायती च्या सरपंच पदासाठी सहा अर्ज सादर झाले आहेत. सदस्यांसाठी ३३ अर्ज सादर झाले आहेत.

- Advertisement -

बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी एकुण चार अर्ज रिंगणात आहेत. तसेच सदस्यपदांसाठी अर्जांची संख्या २२ झाली आहे. त्याचप्रमाणे आक्षी ग्रामपंचायतीच्या थेट सरपच पदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच सदस्यपदांसाठी एकुण २८ अर्ज सादर करण्यात आले आहेत. मुळे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी चार आणि सदस्य पद १८ अर्ज सादर करण्यात आले आहेत.

५ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर ७ डिसेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याचप्रमाणे १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -