घरताज्या घडामोडीहिंम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन निवडणूक लढा; हेमंत गोडसेंचे संजय राऊतांना आव्हान

हिंम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन निवडणूक लढा; हेमंत गोडसेंचे संजय राऊतांना आव्हान

Subscribe

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी. हिंम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा, असे प्रतिआव्हान खासदार हेमंत गोडसे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले. संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना आव्हान दिले होते.

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी. हिंम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा, असे प्रतिआव्हान खासदार हेमंत गोडसे यांनी खासदार संजय राऊत यांना दिले. संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना आव्हान दिले होते. हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावे, असे संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या आव्हानावर आज हेमंत गोडसेंनी प्रतिआव्हान दिले. त्यामुळे आता संजय राऊत याला कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Eknath Shinde Group MP Hemanth Godse Slams Thackeray Group MP Sanjay Raut)

संजय राऊतांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना हेमंत गोडसे म्हणाले की, “राऊत म्हणतात त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा आमची ताकद आहे. मात्र, चेहरा नाही तर काम महत्वाचे असते. राऊत यांनी कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली का? या माणसाने संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे केले. एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचे काम राऊत करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलीन होत आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी आणि हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा”

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर हल्लाबोल केला. या दौऱ्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना गोडसे शिंदे गटात गेले, नाशिकला लोकसभेचा चेहरा कोण असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर संजय राऊतांनी “हेमंत गोडसे हे काय चेहरा आहेत का? शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही. शिवसेना हाच चेहरा आणि शिवसैनिक हीच आमची ताकद आहे. शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात आणि ते आमच्यासोबत असल्याने आम्हाला चिंता नाही”, असे उत्तर दिले होते.

शिवाय, “नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेत निवडून येऊन दाखवावं. त्यांचे राजकीय करिअर संपले आहे. खासदार गोडसे हे तिकडे गेल्यानंतर तर प्यारे झाले आहेत. आता त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आलीय. आता त्यांनी स्वत:ची कबर खोदली आहे.” असेही संजय राऊत म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – सुप्रिया सुळेंबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अब्दुल सत्तारांवर कारवाई? राज्यपालांकडून दखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -