घररायगडमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भुसंपदन रद्द करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भुसंपदन रद्द करा

Subscribe

औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पेण तालुक्यातील डोळवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी करावे. गडब, डोळवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत परिसरातील जमीन संपादित करण्यात येणार आहे.

औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पेण तालुक्यातील डोळवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी करावे. गडब, डोळवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत परिसरातील जमिन संपादित करण्यात येणार आहे. या भुसंपादनाला येथील शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला असून हे भुसंपादन रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना शेतकर्‍यांनी दिले आहे. औद्योगिक विकास महामंडळामार्फत डोळवी औद्यौगिक विकास क्षेत्रासाठी पेण तालुक्यातील वावे, कोळवे, बेणेघाट, डोळवी, खारढोंबी, खारचिर्बी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारजांभेळा, खारघाट या गावातील २१२० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भुसंपादना बाबत येथील शेतकर्‍यांना औद्यौगिक विकास १९६१ चा कलम ३२ (२) अन्वये व्यक्तिगत नोटीस शासनाने बजावल्या. हे भुसंपादन करताना शासनाने शेतकर्‍यांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता नोटीसी बजावल्यामुळे या भुसंपादनाला शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला आहे.

या भुसंपादनामुळे शेतकर्‍यांचे उपजिविकेचे साधन नष्ट होणार आहे. गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहाणार नाही. तर अनेकांची घरे देखील या भुसंपादनात बाधित होणार आहेत. अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय या जागेत आसल्याने अनेकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे या भुसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. हे भुसंपादन रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना शेतकर्‍यांनी दिले आहे. यावेळी आई आकादेवी प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक संस्था गडब अध्यक्ष विजय पाटील, धायरेश्वर शेतकरी संघटना डोळवी अध्यक्ष गजानन पेढवी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दयानंद भगत, परशुराम मोकल, निळेश पाटील, जगन्नाथ जांभळे, अजय याटील, प्रभाकर पाटील, महेंद्र पाटील, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, जनार्दन पाटील, सिताराम चवरकर, दिनेश म्हात्रे, मिलिंद पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –

सोनू सूद नागपूरातील कोरोना रुग्णाच्या मदतीस आला धावून, मिळून दिला रुग्णालयात बेड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -