घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha : नारायण राणेंना कमी लीड मिळालं तर...; नितेश राणेंकडून मतदारांना...

Lok Sabha : नारायण राणेंना कमी लीड मिळालं तर…; नितेश राणेंकडून मतदारांना धमकीवजा इशारा!

Subscribe

नारायण राणेंना जिथे कमी लीड मिळेल, तिथे विकासनिधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही, असा धमकीवजा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार पुढील काही दिवसात होणार आहे. परंतु अद्यापही महायुतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मतदारांना धमकीवजा इशारा दिला आहे. नारायण राणेंना जिथे कमी लीड मिळेल, तिथे विकासनिधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. (Lok Sabha Election 2024 Nitesh Rane threatens voters)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाकडून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली असून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितेश राणे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेच पाहिजेत. जेव्हा नारायण राणे उमेदवार म्हणून समोर असतील, तेव्हा 80 ते 85 टक्के मतदान आपल्याला करायचं आहे. सर्वांचा हिशोब मी घेऊन बसणार आहे. जिथे लीड कमी मिळेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार करायची नाही. नारायण राणे यांचा विजय मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले. परंतु त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात आता चर्चा होताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री अडचणीत; इतिहासाची मोडतोड प्रकरणी कायदेशीर नोटीस

नारायण राणेंकडून प्रचाराला सुरुवात Narayan Rane Started Campaigning)

महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला नसला तरी संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार जाहीर होण्याआधी, दिवस कमी राहिल्याने आपण मोदींचे कार्य घेऊन लोकांपर्यंत जात आहोत. मोदींच्या बाजूने  मतदान करण्याची लोकांना विनंती या मेळाव्यातून करतो आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी निवडणूक येते आणि मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करतो, अशी घाई लोकांना झाली असल्याचा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपाकडे! (Ratnagiri-Sindhudurg seat to BJP)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून दावा सांगण्यात आला होता. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु मध्यंतरी उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचे नाव समोर आले आहे. नारायण राणे यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. परंतु जागावाटपाची चर्चा संपली असली तरी याठिकाणी महायुतीचा कोणता उमेदवार उभा राहणार हे माहीत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार? लवकरच जाहीर करणार निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -