घररायगडLok Sabha Election 2024 : रायगडच्या कुरुक्षेत्रात 'वंचित'ची उडी

Lok Sabha Election 2024 : रायगडच्या कुरुक्षेत्रात ‘वंचित’ची उडी

Subscribe

वंचित बहुजन आघाडीने कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करून रायगड लोकसभा मतदारसंघातील लढतीची रंगत वाढवली आहे.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात महायुती आणि महाविकास आघाडीसोबतच आता वंचित बहुजन आघाडीही उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी (१२ एप्रिल) मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होईल की तिरंगी होईल, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी त्यांचा उमेदवार देणार याची काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. त्यामुळे आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि वंचित बहुजनकडून कुमुदिनी चव्हाण यांच्यात जोरदार लढत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. गीते आणि तटकरे यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. तर कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचाराला सुरुवात व्हायची आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Lok Sabha Election 2024 : पेणमधील वीटभट्टी-हॉटेलमालक ७ मे रोजी काय करणार?

रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून (१२ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत थेट होणाऱ्या लढतीत ‘वंचित’ने उमेदवार दिल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत वाढेल, अशी चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad News : आमदार गोगावलेंविरोधात थेट राष्ट्रपतींना पत्र

कुमुदिनी चव्हाण कोण आहेत?

कुमुदिनी चव्हाण या उच्चशिक्षित असून त्या महाडमधील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा असून मराठा महासंघाच्या रायगड अध्यक्ष आहेत. त्यांचे पती रवींद्र चव्हाण हे महाडमधील उद्योजक तसेच युवा अस्मिता फाऊंडेशनचे संचालक आहेत. शिवाय चव्हाण कोकण विकास प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्षदेखील आहेत.

महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्या तुलनेत ‘वंचित’च्या कुमुदिनी चव्हाण या नवख्या उमेदवार आहेत. तरीही त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्या उच्चशिक्षित असून मराठा समाजाच्या प्रतिनिधीत्व करतात, ही कुमुदिनी चव्हाण यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -