घरमनोरंजन20 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसले इमरान हाश्मी अन् मल्लिका शेरावत

20 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसले इमरान हाश्मी अन् मल्लिका शेरावत

Subscribe

बॉलिवूड सिनेमातील ज्याला रोमान्सचा बादशहा म्हटलं जात असा अभिनेता इमरान हाश्मी. डबल धमाल, वेलकम, हिस्सस और डर्टी पॉलिटिक्स सारख्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत. मल्लिका आणि इमरान हाशमी यांनी मर्डर या सिनेमातून त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांसमोर आणली. 2004 साली आलेला मर्डर हा सिनेमा खूप हिट झाला होता. त्यानंतर मात्र हे दोघेही पुन्हा कधीच एकत्र सिनेमात दिसले नाहीत. अनेक वर्षांनी मल्लिका आणि इमरान हाश्मी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांच्यातील भांडण अखेर 20 वर्षांनी मिटलं आहे. निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं. लग्नानंतर ग्रँड रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला मर्डर स्टार मल्लिका शेरावत आणि इमरान हाशमी या दोघांना आमंत्रण देण्यात आलं होतं. दोघांनी एकत्र या पार्टीला हजेरी लावली. त्या दरम्यान दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघे गळाभेट करत एकमेकांबरोबर पोज देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

2004 साली आलेल्या इरॉटिक थ्रिलर चित्रपट ‘मर्डर’ मध्ये इमरान व मल्लिका यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान इमरान व मल्लिका शेरावत यांच्यात भांडण झालं होतं. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांशी बोलणं व भेटणं टाळायचे. बॉलीवूडमधील सुपरहिट ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक असलेले मल्लिका व इमरान आता अखेर 20 वर्षांनी पुन्हा एका कार्यक्रमात भेटले.

मल्लिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती, तर इमरानने काळ्या रंगाचा सूट घातला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ‘वायरल भयानी’ या अकाउंटवर शेअर केलेला त्यांचा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकानं लिहिलंय, “दोघांनी स्वत:ला छान मेंटेन ठेवलं आहे”. तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, “OMG किती वर्षांनी तुम्हाला एकत्र पाहतोय”. तर आणखी एका युझरनं लिहिलंय, “बोल्डनेसची सुरूवात इथूनच झाली होती”.

- Advertisement -

________________________________________________________________

हेही पहा :

 

Edited by : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -