घररायगडशिरसेवाडी शाळेने बनवले आधुनिक हस्तलिखित

शिरसेवाडी शाळेने बनवले आधुनिक हस्तलिखित

Subscribe

या हस्तलिखिताचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये क्यूआर कोड आहे. वाचकास सहज वाचता यावे व डिजिटल युगात मोबाईलचा वापर करून हस्तलिखित वाचण्यास सुलभ व आकर्षक व्हावे यासाठी क्यूआर कोड चा वापर करण्यात आलेला आहे, असे रवींद्र घोगरे यांनी सांगितले.

खवली केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच राजीप शिरसेवाडी शाळेत संपन्न झाली. यावेळी शिरसेवाडी शाळेचे ’उत्कर्ष’ या आधुनिक हस्तलिखिताचे प्रकाशन सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख शोभा खरात यांनी निपुण भारत अभियान, दिक्षा अ‍ॅप, शिष्यवृत्ती, नवोपक्रम सादरीकरण, शैक्षणिक साहित्य निर्मिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिरसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक नरेश शिंदे व उपशिक्षक रविंद्र घोगरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

यावेळी राजेश जाधव, राजेश गायकवाड, संतोष पाटील, मोहन दहिफळे, दत्तात्रय फुंदे, दिपक कासार, अर्चना साळुंके, प्रियांका मालुसरे, कीर्ती लामदाडे, वंदना लहाने, हेमलता ठोंबरे, सुचीता तेजे, गणेश रक्टे, सुवर्णा घोडे व सागर उकिरडे इत्यादी खवली केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

- Advertisement -

या हस्तलिखिताचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये क्यूआर कोड आहे. वाचकास सहज वाचता यावे व डिजिटल युगात मोबाईलचा वापर करून हस्तलिखित वाचण्यास सुलभ व आकर्षक व्हावे यासाठी क्यूआर कोड चा वापर करण्यात आलेला आहे, असे रवींद्र घोगरे यांनी सांगितले. हस्तलिखितात शाळेत राबविलेले विविध नवोपक्रम, रविंद्र घोगरे यांचा या शाळेतील १२ वर्षाचा प्रवास, मुख्याध्यापक नरेश शिंदे यांचे ३ वर्षातील अनुभव आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी केलेले विविध लेखन, कोलाज काम यांचा समावेश आहे.

तालुक्यातील १५४ शाळांपैकी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील हे पाहिले हस्तलिखित आहे. विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त हस्तलिखित आहे. या शाळेचा उत्कर्ष शब्दाप्रमाणे खरोखरच उत्कर्ष झालेला आहे.
-शिल्पा दास, गटशिक्षणाधिकारी, सुधागड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -