घररायगडदुर्गंधीयुक्त गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नेरळ शहरात डासांचा प्रादुर्भाव

दुर्गंधीयुक्त गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नेरळ शहरात डासांचा प्रादुर्भाव

Subscribe

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आणि नेरळ ग्रामपंचायतीचा आरोग्य विभाग करतो तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

नेरळ शहरातील गटारांची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधीयुक्त गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त गटारांमुळे आणि त्यात झालेल्या जंतूमुळे परिसरात मोठया प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिक हैराण झाले असून नेरळ ग्रामपंचायतीने तात्काळ गटारांमध्ये जंतू नाशक फवारणी सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आणि नेरळ ग्रामपंचायतीचा आरोग्य विभाग करतो तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गटांरामध्ये, सोसायट्यांजवळील आवारात औषध फवारणी केली जात होती. परंतु शहरात गेल्या काही महिन्यांपासून यापैकी कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याने दिसून येत आहे. परिणामी गटारांतून वाहून जाणार्‍या सांडपाण्यावर डासांचा आणि जंतूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर ठिकठिकाणी कचर्‍याचेे ढीग देखील साचल्याचे दिसून येत आहेत.

- Advertisement -

नेरळ शहरात काही भागात दररोज काही भागात कचरा उचलला जात नाही. तसेच गटांवर औषध फवारणी होत नाही. यावर स्वच्छता निरीक्षकांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.नेरळ ग्रामपंचायत सार्वजनिक स्वच्छता, औषध फवारणी अशा कामांवर वर्षाला लाखो रुपये खर्च करते. मात्र, त्या तुलनेत गटारांची स्वच्छता होताना दिसत नाही. सध्या शहरातील निर्माणनगरी, स्टेशन परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून जंतू पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर जंतू नाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -