घररायगडरायगड रोप वेवरील रेस्क्यू ऑपरेशन रिस्कीच

रायगड रोप वेवरील रेस्क्यू ऑपरेशन रिस्कीच

Subscribe

रायगड किल्ल्यावर जाणार्‍या रोपवेवर शुक्रवारी एनडीआरएफच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन कसे करायचे याची रंगीत तालीम घेतली मात्र रोपवेमधील बर्‍याचशा त्रुटी मुळे रेस्क्यू ऑपरेशन एक रिस्कीच आहे, अशी भावना एनडीआरएफच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

महाड: रायगड किल्ल्यावर जाणार्‍या रोपवेवर शुक्रवारी एनडीआरएफच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन कसे करायचे याची रंगीत तालीम घेतली मात्र रोपवेमधील बर्‍याचशा त्रुटी मुळे रेस्क्यू ऑपरेशन एक रिस्कीच आहे, अशी भावना एनडीआरएफच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
रायगड रोपवेच्या ट्रॉलीमध्ये नऊ प्रवासी अडकले असा संदेश राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला मिळतात या दलाने तत्काळ रायगड रोपवे गाठत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. हा बचावाचा थरार म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर अन्य पर्यटकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला. किल्ले रायगडावर ये -जा करण्यासाठी रोपवेची उभारणी करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्ष ही सेवा विनाअपघात सुरू असली तरी सध्या वाढलेली गर्दी आणि विविध कार्यक्रमातून होणारी अचानक होणारी गर्दी या अशावेळी जर एखादी दुर्घटना घडली किंवा रायगड रोपवेची ट्रॉलीमध्येच बंद पडली तर अशा प्रसंगी पर्यटकांना सुरक्षितरित्या कसे बाहेर काढायचे, याची रंगीत तालीम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने घेतली.

रोपवे ट्रॉलीमध्ये प्रवासी अडकले तर…
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल दिल्ली आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल रायगड यांच्यावतीने हे मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी रोपवे ट्रॉलीमध्ये जर प्रवासी अडकले तर त्यांना कशा पद्धतीने सुरक्षित रित्या बाहेर काढायचे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पर्यायी ट्रॉली रायगड रोपेला बसवून त्यातून काही प्रवाशांना बाहेर काढता येणे शक्य आहे तर दोरीच्या साह्यानेही खाली उतरवता येऊ शकते याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे सर्व प्रात्यक्षिक करत असताना जवळपास ४०० मीटर उंचीवर अडकलेल्या प्रवाशांना रेस्क्यू करणे म्हणजे एक रिस्की काम असल्याचे दिसून आले. यावेळी इंडिया रोपवेेचे सेकंड कमांडंट रवी प्रकाश, दीपक तिवारी, निखिल मुधोळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक काम करत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, नायब तहसीलदार अरविंद घेमुड, रायगड रोप वेचे राजेंद्र जोग आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

जबाबदार अधिकारी गैरहजर
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून रायगड रोपवे येथे प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत रंगीत तालीम घेतली असताना महाड महसूल विभागाचे जबाबदार अधिकारी मात्र गैरहजर होते. उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार हे दोन जबाबदार अधिकारी याठिकाणी दिसून आले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीला संबंधित अधिकारी अलिबाग येथे गेल्याचे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली त्याठिकाणी अधिक जोखीम आणि जबाबदारी होती. जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

यापूर्वी नदी समुद्र डोंगर आदी भागांमध्ये मानवी जीव बचावासाठी केलेले प्रयत्न आणि तत्पूर्वी घेण्यात आलेल्या रंगीत तालीम यापेक्षा रायगड रोप वे येथे घेतलेला हा थरार वेगळाच आहे. या ठिकाणी पर्यटक किंवा प्रवासी जर अडकले तर त्यांना कसे वाचवायचे याची रंगीत तालीम घेण्यात आली मात्र रायगड रोपवे मधील कांही त्रुटी देखील यातून दिसून आल्या.
– निखिल मुधोळकर,
एनडीआरएफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -