घररायगडसैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड यांचे निधन; मान्यवरांकडून शोक व्यक्त

सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड यांचे निधन; मान्यवरांकडून शोक व्यक्त

Subscribe

सनपोई गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड (६४) यांचे २५ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावून कॅप्टन गायकवाड लढले होते.

महाड: सनपोई गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन बबनराव गायकवाड (६४) यांचे २५ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावून कॅप्टन गायकवाड लढले होते. बबनराव गायकवाड यांनी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे प्रबोधनकार म्हणून समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला. आपल्या बहारदार लेखणीतून अनेक कवने त्यांनी रचली जो चळवळीचा आवाज बनला. सामाजिक क्षेत्रात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चासारख्या परिवर्तनवादी संघटनेतून त्यांनी अनेक वर्षे काम केले. महाड तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई गायकवाड यांचे ते पती होतं. तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांनी बबनराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

१७ व्या वर्षी भारतीय लष्करात प्रवेश
बबनराव गायकवाड यांनी ३२ वर्षे भारतीय सैन्य दलात काम करून देशसेवेसाठी आपले योगदान दिले. लहानपणीचं डोईवरील माता-पित्याचे छत्र हरपल्यानंतर बबनराव यांनी वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय लष्करात प्रवेश घेतला. त्यानंतर अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी एक सैनिक ते अधिकारी पदापर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. गायन आणि कवित्व हा छंद कुमारवयापासून जोपासणार्‍या बबनराव यांनी कव्वाली, भावगीते, भक्तीगीते, गझल अशा कलेच्या प्रांतात चौफेर मुशाफिरी केली.

- Advertisement -

महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार

आपला भारदस्त आवाज आणि अभ्यासू लेखणीतून त्यांनी आपल्या प्रबोधनपर गीतांची समाजमनावर कायमच छाप सोडली. नाशिक येथील मिलिंद संस्थेच्या लोकरंजन कला मंडळाचा महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशा अनेक गौरवांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या पत्नी सुनिताताई गायकवाड या देखील सामाजिक कार्यात अग्रणी असून त्यांनी आसनपोई गावचे सरपंच पदही भूषवले आहे. बबनराव यांची कन्या प्रतिक्षा हिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग खेळातून सोनेरी कामगिरी करीत देशाचे, महाराष्ट्राचे नाव चकमवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -