घररायगडनव्या पिढीला कॉग्रेसचा इतिहास सांगा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

नव्या पिढीला कॉग्रेसचा इतिहास सांगा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

Subscribe

पंडित जवाहरलाल नेहरूंना विरोधक कायम बदनाम करतात. कारण पंडित नेहरू केवळ पंतप्रधान नव्हते तर विचारवंत होते. त्यांनी देशाला प्रगतीवर नेण्याचे काम केले. नव्या पिढीला ही बाब सांगण्यास आपण कमी पडत आहोत. समाजमाध्यमावर होणार्‍या जोरदार विरोधी प्रचारामुळे आपण काँग्रेसचा विचार रूजविण्यास कमी पडत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला काँग्रेसचा इतिहास सांगा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

पनवेल: पंडित जवाहरलाल नेहरूंना विरोधक कायम बदनाम करतात. कारण पंडित नेहरू केवळ पंतप्रधान नव्हते तर विचारवंत होते. त्यांनी देशाला प्रगतीवर नेण्याचे काम केले. नव्या पिढीला ही बाब सांगण्यास आपण कमी पडत आहोत. समाजमाध्यमावर होणार्‍या जोरदार विरोधी प्रचारामुळे आपण काँग्रेसचा विचार रूजविण्यास कमी पडत आहोत. त्यामुळे नव्या पिढीला काँग्रेसचा इतिहास सांगा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. इंटक आणि पनवेल शहर काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पटोले प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
यावेळी इंटकचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड, इंटकचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल काँग्रेस निरीक्षक माजी आमदार हुस्नबानू खलिफे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, इंटक नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील यांच्यासह इंटक व काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कामगार संघटनांचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.या मेळाव्यास पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली तसेच काही कार्यकर्त्यांनी काँग्र्रस पक्षात प्रवेश केला तर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोप्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला.नाना पटोले यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.

विरोधकांना इतिहास इतरांना बदनाम करायचा आहे
भाजपाकडून काँग्रेसवर टिका केली जाते, काँग्रेसने काय केले; असा प्रश्न उपस्थित करून नाना पटोले यांनी काँग्रेसमुळे देशाची प्रगती कशी झाली याचा पाढा वाचला. स्वातंत्र्यानंतर अवघ्या ५० गावांमध्ये वीज पोहचली होती. आता प्रत्येक गावांत वीज आहे, इंटरनेटक्रांती झाली आहे. परंतु आम्ही काँग्रेसचा इतिहास तोंडी सांगायला कमी पडतो अशी कबुली पटोले यांनी दिली. तुमचे आजोबा, वडील काँग्रेसमुळे शिक्षण घेवू शकले, त्यांना नोकरी लागली. आपण नव्या पिढीला हे सांगितले पाहिजे. विरोधकांना इतिहास इतरांना बदनाम करायचा आहे आणि वर्तमान देश विकण्याचा आहे, काँग्रेसने मेहनतीने उभ्या केलेल्या संस्था भाजपा विकत आहे. देशाची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली हा देखील काँग्रेसचा इतिहास आहे, असेही नाना पटोले यांनी या वेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -