घररायगडमहाडमध्ये तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत

महाडमध्ये तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत

Subscribe

मागील काही दिवसात कोकणात देखील उष्मा जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान गेली दोन वर्षापूर्वी ३५ ते ४० अंशापर्यंत गेले होते. मात्र आता कोकणातील बहुतांश भागात हे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातवरणात कमालीचे बदल होत असून बुधवारी महाडमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४३ अंश सेल्सिअस पर्यंत गेला. त्यामुळे माणसांसह जनावरांना देखील उष्म्याचा फटका बसू लागला आहे. जनावरांना उष्णमाघात आणि कोल्ड स्ट्रोक ची बाधा होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पशु वैद्यकीय विभागाकडून केले जात आहे.

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. यामुळे विविध ठिकाणचे तापमान प्रतिवर्ष वाढतच चालले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढलेला असतानाच मागील काही दिवसात कोकणात देखील उष्मा जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान गेली दोन वर्षापूर्वी ३५ ते ४० अंशापर्यंत गेले होते. मात्र आता कोकणातील बहुतांश भागात हे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. ऐन सुटीच्या काळात तापमानाने कहर केल्याने गावी येणार्‍यांची संख्या देखील घटली आहे. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या वाढत्या उष्म्याचा फटका मानवी जीवनाला बसत आहे तसाच ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना देखील बसत आहे.

- Advertisement -

कोकणात ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात जनावरे उघड्यावर मोकाट सोडून दिली जातात. तीव्र उन्हात ही जनावरे मिळेल ते पाणी पितात. यामुळे जनावरांच्या पोटात विषबाधा होते. काही जनावरे उन्हात भटकल्यानंतर वेगाने पाणी पितात. यामुळे कोल्ड स्ट्रोक येतो आणि जनावर दगावते. उन्हाळ्यात लागत असलेल्या वनव्याने जनावरांचा चारा नष्ट होतो. यामुळे ही जनावरे मिळेल ते खातात. अनेकवेळा लग्न सोहळ्याच्या वेळी बाहेर पडलेल्या पत्रावळ्यावरील अन्न खाल्ल्याने देखील जनावरांना विष बाधा होते. उन्हाळ्यातील तीव्र उष्मा जनावरांना त्रासदायक ठरत आहे. पाळीव जनावरांमध्ये बकर्‍या, कोंबड्या यांना देखील उन्हाचा फटका बसत आहे. कोंबड्यांमध्ये देवी आणि रानीखेत हा आजार उद्भवतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -