घररायगडचवदार तळ्यावर लोटला भिमसागर

चवदार तळ्यावर लोटला भिमसागर

Subscribe

चवदारतळे सत्याग्रहाच्या ९६ व्या स्मृतीदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येथे सोमवारी भिमसागर लोटतानाच चवदारतळे, क्रांतीस्थंभ परिसर जय भिमच्या घोषणांनी दणाणून गेला. चवदार तळ्यावर ज्या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याला स्पर्श केला त्या पायर्‍यांवर भीम अनुयायांनी पाणी प्राशन करण्यासाठी आणि चवदारतळ्याचे पाणी कलशातून घेवून जाण्यासाठी एकच गर्दी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच चवदार तळे येथे भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांनी चवदारतळे विकासाला चालना दिली जाईल असे सांगून अमृतसरच्या धर्तीवर चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवला जाईल असेही स्पष्ट केले.

महाड: चवदारतळे सत्याग्रहाच्या ९६ व्या स्मृतीदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी येथे सोमवारी भिमसागर लोटतानाच चवदारतळे, क्रांतीस्थंभ परिसर जय भिमच्या घोषणांनी दणाणून गेला. चवदार तळ्यावर ज्या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याला स्पर्श केला त्या पायर्‍यांवर भीम अनुयायांनी पाणी प्राशन करण्यासाठी आणि चवदारतळ्याचे पाणी कलशातून घेवून जाण्यासाठी एकच गर्दी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच चवदार तळे येथे भेट देवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांनी चवदारतळे विकासाला चालना दिली जाईल असे सांगून अमृतसरच्या धर्तीवर चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवला जाईल असेही स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री उदय सामंत, आमदार गोगावले, आमदार योगेश कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सिद्धार्थ कासारे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजबिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, आदी मान्यवर उपस्थित होते. विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार यावर्षी प्रथमच चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय पोलीस मानवंदना देण्यात आली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रायगड पोलिसांच्या पथकाने ही मानवंदना दिली यावेळी आमदार भरत गोगावले यांच्यासह हजारो भीमसैनिक उपस्थित होते.
स्थानिक प्रशासनाकडून क्रांतीस्थंभ आणि चवदारतळे याठिकाणी मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील विविध संस्थांनी मोफत भोजनदानाचीही व्यवस्था केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक संस्था, हिंदूस्थान पेट्ोलीयम एससी एसटी कामगार संघटना, भारतीय आयुर्विमा महामंडळ एससी एसटी कामगार संघटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, एकविरा पतसंस्था, चवदार तळे विचार मंच, ओ.एन.जी.सी. एस.सी – एस.टी.कामगार संघटना, कोकण रिपब्लिकन संस्था, आदी संघटना तसेच संस्थांकडून मोफत भोजनदान तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रभाकर नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे धम्मज्योति गजभिये, पूजनीय राहुल बोधी महाथेरो आदी उपस्थित होते.

सामाजिक क्रांतीचा ९६ वा स्मृतिदिन 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील तमाम शोषित, पिडीतांच्या न्याय हक्कासाठी महाडमध्ये जागतिक पातळीवरील सामाजिक क्रांती केली. या क्रांतीचा ९६ वा स्मृतिदिन सोमवारी महाडमध्ये साजरा झाला. यावेळी विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून उसळलेल्या भिमसागरामुळे चवदारतळे परिसर भीम जयघोषाने दणाणून गेला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीच्या मीराताई आंबेडकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, आदी दिग्गज नेत्यांनी महाडमध्ये अभिवादन केले.

- Advertisement -

धर्माच्या नावावर राजकारण – आनंदराज आबेडकर
देशात सद्य स्थितीत वाईट परिस्थिती असून देशातील नागरिकांना पुन्हा गुलाम करून आपली सत्ता स्थापन करण्याचा डाव रचला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण केली जात असून धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. पैशाने मत विकत घेतले जात असल्याने लोकशाही देखील धोक्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच जागे झाले पाहिजे. देशात सामाजिक समतेचा पाया रचण्याचे काम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला असून या सामाजिक समतेसाठी आणि संविधान अबाधित राखण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांची गरज असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी महाड मध्ये केले.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीमुळे शोषित पिडीतांना न्याय मिळाला यामुळे या चवदारतळ्याला ऐतिहासिक महत्व आहे. या चवदार तळ्याच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जाईल.
– एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -