घरक्रीडाधोनी नेहमीच मदत करतो, पण प्रश्नाचे पूर्ण उत्तर देत नाही -पंत 

धोनी नेहमीच मदत करतो, पण प्रश्नाचे पूर्ण उत्तर देत नाही -पंत 

Subscribe

धोनी आणि माझ्यात चांगले संबंध आहेत, असे पंतने स्पष्ट केले आहे. परंतु, पंत किंवा इतरही युवा खेळाडूंना मदत करण्याची धोनीची पद्धत जरा वेगळी आहे.  

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्याला वगळून भारतीय संघ युवा रिषभ पंतला संधी देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे या दोघांमधील संबंध कसे असतील याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आमच्यात फार चांगले संबंध असून धोनी हा माझ्यासाठी गुरूप्रमाणे आहे, असे पंतने स्पष्ट केले आहे. परंतु, पंत किंवा इतरही युवा खेळाडूंना मदत करण्याची धोनीची पद्धत जरा वेगळी आहे.

माही भाई (धोनी) हा माझ्यासाठी गुरूप्रमाणे आहे, मग ते मैदानात असो किंवा मैदानाबाहेर. मला काहीही समस्या असेल तर मी त्याच्याशी मोकळेपणाने चर्चा करतो. तो नेहमीच मदत करतो, पण प्रश्नांची कधीही पूर्ण उत्तरे देत नाही. तो मला सल्ला देतो जेणेकरुन मी स्वतःच समस्या सोडवू शकेन. त्याने असे करण्यामागचे कारण म्हणजे मी पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहू नये असे त्याला वाटते, असे पंत म्हणाला.

- Advertisement -

तसेच पंतला धोनीसोबत फलंदाजी करतानाही मजा येते. मला माही भाईसोबत फलंदाजी करायलाही खूप आवडते, पण आम्हाला एकत्र खेळायची फारशी संधी मिळत नाही. तो जेव्हा खेळपट्टीवर असतो, तेव्हा इतरांना फारशी चिंता नसते. त्याने योजना आखलेली असते. तुम्ही फक्त तो सांगतो तसे केले पाहिजे, असेही पंतने सांगितले.

धोनी मागील वर्षीच्या जुलैपासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार होता. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे धोनीचे भारतीय संघातील पुनरागमन आता अधिकच अवघड झाले आहे.

- Advertisement -

पॉन्टिंग, गांगुली यांचा सल्ला उपयोगी! 

रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंग या संघाचा प्रशिक्षक असून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने २०१८ मध्ये या संघाचा सल्लागार म्हणून काम केले होते. या दोघांनी दिलेल्या सल्ल्यांचा पंतला फायदा झाला आहे. २०१८ आयपीएलमध्ये मी दिल्लीकडून सर्वाधिक धावा केल्या आणि तो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा मोसम होता. पॉन्टिंग कधीही माझ्यावर दबाव टाकत नाही. तू तुला हवा तसा खेळ असे पॉन्टिंग मला नेहमी सांगतो. तसेच गांगुलीनेही मला सल्ला दिला होता. खेळपट्टीवर थोडा वेळ घालव आणि त्यानंतर हवा तसा खेळ. मी चांगली कामगिरी करावी असे त्या दोघांनाही वाटते, असे पंत म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -