आर्चरीमध्ये साताऱ्याच्या आदितीची सुवर्ण कामगिरी, तर पार्थ कोरडेला रौप्यपदक

Aditi swami

खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games 2022) आर्चरी (archery) स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या आदिती स्वामीने ( aditi swami) सुवर्ण कामगिरी केली आहे. तर अहमदनगरच्या पार्थ कोरडेने रौप्यपदक पटकावले आहे. पंजाब युनिर्व्हिसिटीच्या मैदानावर झालेल्या आर्चरीमध्ये साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला आहे. कम्पाउंड राऊंडमध्ये आदितीने हे यश मिळवले आहे. आदितीने केलेल्या या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले आहे. पार्थ कोरडेचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले असून त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

आदितीने पंजाबच्या अवनित कौरचा पराभव केला आहे. आदितीचा स्कोर १४४ होता तर अवनित कौरने १३७ गुण मिळवले होते. अहमदनगरच्या पार्थने दुसरे पदक पटकावले आहे. पार्थ आणि आंध्र प्रदेशच्या व्यंकीसोबत अंतिम सामना झाला होता. मात्र, या सामन्यात पार्थने खराब सुरूवात केली होती. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या व्यंकीने आघाडी मिळवत एका गुणाने पार्थला पिछाडीवर टाकलं. त्यामुळे पार्थचा स्कोर १४४ होता तर आंध्रप्रदेशच्या व्यंकीने १४५ स्कोर मिळवले.

बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

बॉक्सिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. सिमरन वर्मा, रिशिका होले, साई डावखर, आदित्य गौंड, माणिक सिंग, कुणाल घोरपडे, सुरेश विश्वनाथ, विजयसिंग, व्हिक्टर सिंग यांनी विविध गटांतील सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर व्हिक्टर सिंगने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

जलतरणमध्ये सुवर्ण सूर

जलतरणमध्ये अपेक्षा फर्नांडिसने २०० मीटरमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. तिने २.२५.१० अशी विक्रमी वेळ नोंदवली आहे. यापूर्वी किनिषा गुप्ताचा २.२५.८० असा विक्रम होता. पलक जोशीने २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य २.२७.०१ रिषभ दासने २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य २.२१२ पदक पटकावले.

सायकलिंग स्पर्धेत आदिल अल्ताफचं पहिलं सुवर्णपदक

जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेल्या आदिल अल्ताफने युथ गेम्स सायकलिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम केला आहे. आदिलचे वडील व्यवसायाने शिंपी आहेत. आदिलने ७० किमी रोड रेसमध्ये आपला झेंडा फडकावला. यापूर्वी त्याने २८ किमी शर्यतीतही रौप्यपदक जिंकले होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही आदिलचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.


हेही वाचा : ENG vs NZ: ट्रेंट बोल्टची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट खेळी, मुथय्या मुरलीधरनचा मोडला विश्वविक्रम