ENG vs NZ: ट्रेंट बोल्टची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट खेळी, मुथय्या मुरलीधरनचा मोडला विश्वविक्रम

trent boult

न्यूझीलंड आणि इंग्लंड (ENG vs NZ) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ट्रेंट बोल्टने एक खास विक्रम केला आहे. ११व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सर्वात कमी डावात ६२३ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनने ८७ कसोटीत ६२३ धावा केल्या होत्या आणि या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आता बोल्टने धावसंख्येच्या बाबतीत त्याची बरोबरी केली आहे, मात्र बोल्टने हा विक्रम अवघ्या ६९ डावांत गाठून मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले आहे.

बोल्टने इंग्लंडविरुद्ध १८ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने १६ धावांची खेळी खेळली. बोल्टने आपल्या कसोटी कारकिर्दीत ६९ सामन्यांत १६.३९ च्या सरासरीने ६२३ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीतही अर्धशतक ठोकले आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा बोल्ट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.

कसोटीत ११ व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

६२३ – ट्रेंट बोल्ट
६२३ – मुथय्या मुरलीधरन
६०९ – जेम्स अँडरसन
६०३ – ग्लेन मॅकग्रा
५५३ – कोर्टनी वॉल्श

नॉटिंघहॅम कसोटीत न्यूझीलंडची पकड मजबूत

नॉटिंघहॅम कसोटी मालिकेतील दोन दिवसांचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत आहे. प्रथम फलंदाजी करताना किवींनी पहिल्या डावात ५५३ धावा केल्या. डॅरिल मिशेलने १९० आणि टॉम ब्लंडलने १०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या मोबदल्यात ९० धावा केल्या आहेत. अॅलेक्स लीस ३४ आणि ओली पोप ५१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या संघाकडे अजूनही ४६३ धावांची आघाडी आहे, तर इंग्लंडकडे नऊ विकेट्स आणि तीन दिवसांचा खेळ बाकी आहे.


हेही वाचा : AUS vs SL: कर्णधार शनाकाने अखेरच्या षटकात श्रीलंकेला जिंकवले, पण मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात