Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs NZ 2nd Test : १० विकेट्स घेणारा एजाझ पटेल...

IND vs NZ 2nd Test : १० विकेट्स घेणारा एजाझ पटेल ठरला तिसरा खेळाडू, वानखेडेवर नव्या इतिहासाची नोंद

Subscribe

टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. टीम इंडियासाठी खेळाची सुरूवात चांगली राहिलेली नाहीये. कारण न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा धक्का दिला आहे. फिरकीपटू एजाज पटेलने टीम इंडियाचे १० गडी बाद करत आजच्या सामन्यात इतिहास रचला आहे. टीम इंडियाने ३२५ धावा पूर्ण केल्या आहेत. परंतु एजाज पटेलने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना बाद केलं आहे.

- Advertisement -

एका सामन्यात दहा विकेट घेणारा न्यूझिलडंचा फिरकीपटू एजाझ पटेल तिसरा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने मंबईतील वानखेडेच्या स्टेडियमवर नवा इतिहास देखील रचला आहे. याआधी इंग्लंडमधून जिम लेकर आणि टीम इंडियातून अनिल कुंबळे या दोन खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली होती. परंतु आज(शनिवार) न्यूझिलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने १० विकेट्स घेत टीम इंडियाला धक्के दिले आहेत.

एकाच संघात दहा विकेट्स घेणारे गोलंदाज –

जिम लेकर – १० विकेट्स, सामना – ऑस्ट्रेलिया, वर्ष – १९५६

- Advertisement -

अनिल कुंबळे – १० विकेट्स, सामना – पाकिस्तान ,वर्ष – १९९९

एजाझ पटेल – १० विकेट्स, सामना-टीम इंडिया , वर्ष-२०२१

टीम इंडियाचे दहा गडी बाद – 

एजाझ पटेलने काल दिवसभरात ४ गडी बाद केल्यानंतर त्याने ऋद्धीमान साहाला (२७) धावांवर पायचित करत पाचवी विकेट घेतली. त्यानंतर आर. अश्विनला त्रिफळाचित केलं. त्यामुळे अश्विन शून्य धावा बनवत आऊट झाला. फलंदाज मयंक अग्रवालला सुद्धा टॉम ब्लंडेलकरवीने झेलबाद केलं आहे. मयंक अग्रवाल माघारी फिरल्यानंतर अक्षर पटेलने मैदानात एन्ट्री घेतली होती. परंतु एजाझने अक्षरला (५२) धावांवर पायचित केलं. पटेलने ९ वी विकेट ही जयंत यादवची घेतली. त्यानंर मोहम्मद सिराजने ४ धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु एजाझच्या फिरकीमुळे त्याला १० विकेट सुद्धा सहज मिळाली. या १० विकेट्सनंतर त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचला आहे.

टीम इंडियाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेने देखील ट्विट करत एजाझचं कौतुक केलं आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -