घरक्रीडाIND vs SL: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षर पटेल भारतीय संघात दाखल ;...

IND vs SL: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षर पटेल भारतीय संघात दाखल ; कुलदीप, जयंतला बाहेरचा रस्ता

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अष्टपैलू अक्षर पटेल खेळण्यास सज्ज झाला आहे. बंगळुरूतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यास त्याची निवड निश्चित आहे. या सामन्यात जयंत यादवऐवजी त्याचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. पहिल्या सामन्यात जयंत यादव काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला एकही विकेट घेता आला नाही. त्यामुळे अक्षर पटेलला संधी मिळण्याची खात्री आहे. त्याचा भारतातील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.

अक्षरच्या जागी कुलदीप यादवला संघात संधी देण्यात आली नाही. तो भारताच्या मुख्य संघाचा भाग होता, परंतु अक्षर फिट झाल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. भारतीय संघात तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांची गरज नसल्याचे संघ व्यवस्थापनाचे मत आहे. जडेजा आधीच टीम इंडियाचा भाग आहे. त्याचवेळी अक्षर आणि कुलदीपही संघाशी जोडले गेले आहेत.

- Advertisement -

भारतीय संघात पाच फिरकीपटूंचा समावेश

जयंत यादव आणि रविचंद्रन अश्विन हे पाच फिरकीपटू गोलंदाज आधीच टीम इंडियात खेळत आहेत. यानंतर संघात जडेजा, अक्षर आणि कुलदीपसह एकूण पाच गोलंदाज आहेत. पहिल्या कसोटीत फक्त जडेजा आणि अश्विनने मिळून १५ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे १८ जणांच्या संघात पाच फिरकी गोलंदाजांची गरज नाहीये. यामुळे कुलदीपला संघातून वगळण्यात आले आहे. कुलदीपशिवाय इतर फलंदाजी प्रशिक्षक अपूर्व देसाई, प्रशिक्षक आनंद दाते आणि फिजिओ पार्थो यांनाही वेगळे करण्यात आले आहे. मात्र, साईराज बहुले संघाशी संलग्न आहेत.

भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाल, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज , उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).

- Advertisement -

हेही वाचा : दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : नाना पटोले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -