घरक्रीडाZIM vs BAN : झिम्बाब्वेत खेळांवर बंदी, तरी बांगलादेश संघाचा दौरा होणारच!

ZIM vs BAN : झिम्बाब्वेत खेळांवर बंदी, तरी बांगलादेश संघाचा दौरा होणारच!

Subscribe

बांगलादेशच्या झिम्बाब्वे दौऱ्याला ७ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, झिम्बाब्वेमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या खेळांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी बांगलादेश पुरुष क्रिकेट संघ ठरल्याप्रमाणे झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे प्रेक्षकांविना होणार आहेत. तसेच दोन्ही संघ बायो-बबलमध्ये राहणार असल्याचेही झिम्बाब्वे क्रिकेटकडून सांगण्यात आले. बांगलादेशच्या झिम्बाब्वे दौऱ्याला कसोटी सामन्यापासून सुरुवात होणार असून हा सामना ७ ते ११ जुलै या कालावधीत खेळला जाईल.

बांगलादेश संघाला विशेष परवानगी

झिम्बाब्वेमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील आठवड्यात नवे निर्बंध लावण्यात आले होते. सर्व प्रकारच्या खेळांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, बांगलादेश पुरुष क्रिकेट संघाला झिम्बाब्वेमध्ये येण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेश या संघांमध्ये कसोटी सामन्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

- Advertisement -

वर्ल्डकपच्या पात्रतेसाठी सामने महत्त्वाचे

एकदिवसीय मालिकेचे सामने १६, १८ आणि २० जुलैला होणार आहेत. हे सामने सुपर लीगचा भाग असणार आहेत. त्यामुळे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या पात्रतेसाठी या सामन्यांचे निकाल ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर तीन टी-२० सामने अनुक्रमे २३, २५ आणि २७ जुलैला पार पडतील. या झिम्बाब्वे दौऱ्याला बांगलादेशचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज मुशफिकूर रहीम मुकण्याची शक्यता आहे. मुशफिकूरच्या हाताला दुखापत झाली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -