घरक्रीडाअंध मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धा लवकरच नाशिकमध्ये

अंध मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धा लवकरच नाशिकमध्ये

Subscribe

जीवनात आनंद व चैतन्याचा प्रकाश शोधण्याची धडपड करणार्‍या अंध मुला-मुलींसाठी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नॅब, डॉ. एम.एस. मोडक सेंटर नाशिक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाईंड मुंबई, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यातर्फे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणार्‍या साहित्याचे वाटप शुक्रवारी (ता. १४) करण्यात आले.

स्पर्धेसाठी मुला-मुलींना नामवंत प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही मुले येत्या काळात उत्तम क्रिकेट खेळतील व नावलौकिक संपादन करतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, डॉ. एम.एस. मोडक सेंटर व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य विनायक रानडे, डॉ. मोडक सेंटरच्या सेक्रेटरी शाहीन शेख, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे मुंबईचे सचिव रमाकांत साटमा, प्रकल्प व्यवस्थापक पंक्ती लालाजी, खजिनदार दादाभाऊ कुटे, मार्गदर्शक अजय मुनी, फिजीओथेरपीस्ट डॉ. सायली पवार, तसेच चंद्रभागा मौैळे, उषा मौळे, शारदा उगले, उर्मिला हिरे, डॉ. मोडक सेंटरचे खजिनदार विश्वास ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -