घरक्रीडाचेन्नईचे गणित बिघडले

चेन्नईचे गणित बिघडले

Subscribe

नवा खेळाडू शोधण्याचे आव्हान

चेन्नई, चेन्नई सुपर किंग्सचा भरवशाचा गोलंदाज लुंगी एंगीडीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या आणखी एका खेळाडूने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हिलीने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिलीच्या पत्नीने दुसर्‍या मुलाला जन्म दिला आणि त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले.

तो आता आयपीएलच्या संपूर्ण सत्रात खेळणार नाही. त्यामुळे कॅप्टन कूल धोनीची चिंता वाढली होती. परंतु चेन्नईने एंगीडीला बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या 27 वर्षीय गोलंदाज स्कॉट कुगेलेग्नला चमूत दाखल करून घेतले आहे. पण, व्हिलीला बदली खेळाडू कोण, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. स्कॉटने न्यूझीलंड संघाकडून 2 वन डे आणि 4 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. स्कॉटवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले आहेत आणि भारताच्या न्यूझीलंड दौर्‍यातही त्याच्यावर टीका झाली होती.

- Advertisement -

चेन्नईने आयपीएलच्या 12 व्या सत्रासाठी आठ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले होते आणि व्हिली हा त्यापैकी एक आहे. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला गतवर्षी केदार जाधवच्या जागी करारबद्ध केले होते आणि 2019च्या लिलावात चेन्नईने त्याला कायम राखले. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एंगीडीला दुखापतीमुळे आधीच माघार घ्यावी लागली होती. त्याची उणीव जाणवत असल्याची कबुली कॅप्टन धोनीने दिली होती. त्यात व्हिलीच्या जाण्याने चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -