घरक्रीडाचिराग-सात्विक उपांत्यपूर्व फेरीत

चिराग-सात्विक उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

चीन ओपन बॅडमिंटन

भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत साई प्रणित आणि पारुपल्ली कश्यप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. प्रणितला डेन्मार्कच्या चौथ्या सीडेड आंद्रेस अँटोन्सनने २०-२२, २२-२०, १६-२१ असे पराभूत केले. कश्यपवर डेन्मार्कचाच सातव्या सीडेड व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनवर १३-२१, १९-२१ अशी मात केली.

पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी जपानच्या हिरोयुकी इंडो आणि युटा वाटांबेचा २१-१८, २१-२३, २१-११ असा पराभव केला. सात्विक-चिरागची जपानी जोडीवर मात करण्याची सलग दुसरी वेळ होती. याआधी त्यांनी मागील महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये जपानी जोडीला पराभूत केले होते. आता सात्विक-चिरागचा पुढील फेरीत ली जून हुई आणि लिऊ यु चेन यांच्याशी सामना होईल.

- Advertisement -

सात्विक-पोनप्पा पराभूत
सात्विकसाईराज रणकिरेड्डीने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असला तरी मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पासोबत खेळताना त्याचा उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. भारताच्या या जोडीला कोरियाच्या पाचव्या सीडेड सेव सेऊन्ग जे आणि चे युजंगने २१-२३, १६-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -