घरक्रीडाकॉमनवेल्थमध्ये विजयी सुरुवात : टेबल टेनिस स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने...

कॉमनवेल्थमध्ये विजयी सुरुवात : टेबल टेनिस स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने उडवला धुव्वा

Subscribe

२२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने शानदार कामगिरीला सुरूवात केली आहे. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुलानं दमदार कामगिरी केली. टेबल टेनिस महिला ग्रुप २ च्या पात्रता फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३-० असा पराभव केला आहे.

श्रीजा अकुला आणि रीट टेनिसन या पहिल्या भारतीय जोडीने दुहेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड-दानिशा पटेल जोडीचा ११-७, ११-७, ११-५ असा पराभव केला. या विजयामुळे भारताला १-० अशी आघाडी मिळाली होती.

- Advertisement -

भारताने या ग्रुप मॅचमध्ये एक डबल्स आणि दोन सिंगल्स मधील सामने जिंकले आहेत. महिला संघाचा पुढील सामना रात्री ८.३० वाजता फिजीशी होईल. दरम्यान, पुरूष संघाचा सामना बार्बाडोसविरुद्ध संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे.

- Advertisement -

भारतीय खेळाडूंनी १५ खेळ आणि ४ पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतलाय. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला आणखी पदकं मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, दुसरीकडे भारताच्या तानिया चौधरीला लॉन बॉलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिला स्कॉटलंडच्या डी हाँगने २१-१० असे पराभूत केले.


हेही वाचा : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -