घरक्रीडाCorona Vaccination : अजिंक्य रहाणेनंतर उमेश यादवनेही घेतली कोरोना लस

Corona Vaccination : अजिंक्य रहाणेनंतर उमेश यादवनेही घेतली कोरोना लस

Subscribe

उमेशने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.

अजिंक्य रहाणेनंतर शनिवारीच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. याबाबतची माहिती उमेशने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘लसीकरण झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार. संधी मिळेल तेव्हा तुम्हालाही लस घेण्याचे मी आवाहन करतो,’ असे उमेशने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. त्याआधी शनिवारीच सकाळी अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिकाने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे असल्याचे रहाणे म्हणाला होता. रहाणे आणि उमेश या दोघांचीही आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

- Advertisement -

रहाणे, धवननेही घेतली लस

मागील दिवसांत कोरोनाची लस उमेश हा भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी शनिवारीच अजिंक्यने, तर काही दिवसांपूर्वी सलामीवीर शिखर धवननेही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी त्यानेही सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले होते. भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित व्यक्तींमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्वात आधी लस घेतली होती. त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लसीकरण करून घेतले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -