घरक्रीडाVideo : कॅमेरून ग्रीनच्या जोरदार बाऊन्सरवर फलंदाजाचे हेलमेट गुल; फलंदाज थोडक्यात वाचला

Video : कॅमेरून ग्रीनच्या जोरदार बाऊन्सरवर फलंदाजाचे हेलमेट गुल; फलंदाज थोडक्यात वाचला

Subscribe

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या ३६१ धावांचा पाठलाग करताना क्वीन्सलँडचा २९ वर्षीय विकेटकिपर खेळाडू जिमी पीअरसन गंभीर दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला

नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावून एक नवा अध्याय रचला. तर तिकडे ऑस्ट्रेलियन संघाचे युवा खेळाडू देशांतर्गत सामन्यांमध्ये शानदार खेळी करत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियात देशांतर्गत मार्श कप स्पर्धेचे आयोजन केले आहे. याच स्पर्धेमध्ये नुकत्याच झालेल्या एका सामन्यात क्वीन्सलँड आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्वीन्सलँडचा ७० धावांनी पराभव केला होता. दरम्यान या सामन्यात एक मोठी घटना होता होता राहिली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या ३६१ धावांचा पाठलाग करताना क्वीन्सलँडचा २९ वर्षीय विकेटकिपर खेळाडू जिमी पीअरसन गंभीर दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला.

सामन्यादरम्यान ही घटना तेव्हा झाली जेव्हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा २२ वर्षीय युवा गोलंदाज कॅमेरून ग्रीन गोलंदाजी करण्यासाठी आला. कॅमेरून ग्रीनने २८ व्या षटकांतील एक चेंडू बाऊन्सर टाकला आणि विरोधी फलंदाजाने हा चेंडू सोडण्यापेक्षा मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क न झाल्याने चेंडू सरळ जावून पीअरसनच्या हेलमेटला जावून लागला. हेलमेटला चेंडू लागताच हेलमेट २ मीटर अंतरावर दूर जाऊन पडले सुदैवाने फलंदाजाला कोणतीही दुखापत झाली नाही.

- Advertisement -

चेंडू एवढ्या गतीने होता की फलंदाजाचे हेलमेट तुटून मैदानात २ मीटर लांब जाऊन पडले. यानंतर लगेचच डॉक्टरांची एक टीमला बोलवण्यात आले. लक्षणीय बाब म्हणजे या संपूर्ण घटनेत फलंदाज पीअरसनला कोणतीही दुखापत झाली नाही आणि त्याने पुढे देखील फलंदाजी चालू ठेवली. त्यासामन्यात पीअरसनने ५० चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या आणि त्याला बाद करण्यात अँड्र्यू टायला यश आले. तर त्या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्वीन्सलँडचा संघ ४८.५ षटकांत २९१ धावांवरच सर्वबाद झाला. संघाकडून जो बर्न्सने सर्वाधिक ७३ धावा केल्या पण त्या धावा संघाला विजय मिळवून देण्यात मात्र अपुऱ्या ठरल्या.

- Advertisement -

हे ही वाचा: PAK vs BAN: बांगलादेशात सरावातच फडकला पाकचा झेंडा; नव्या वादाला तोंड फोडले


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -