घरक्रीडावर्ल्डकप अजूनही आमचाच!

वर्ल्डकप अजूनही आमचाच!

Subscribe

बेन स्टोक्सचे विधान

इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडला आपल्या घरच्या मैदानावर होणारा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, श्रीलंकापाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश अवघड झाला आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे इंग्लंड गुणतक्त्यात चौथ्या स्थानी घसरला असून ७ सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात ८ गुण आहेत. मात्र, असे असतानाही इंग्लंड हा विश्वचषक जिंकू शकतो, असा अष्टपैलू बेन स्टोक्सला विश्वास आहे.

विश्वचषक अजूनही आमचाच आहे. मागील चार वर्षांत आम्हाला चाहत्यांचा खूप पाठिंबा लाभला आहे. चाहते आणि खेळाडू यांच्यासाठी विश्वचषकाचे खूप महत्त्व असते. क्रिकेटपटू म्हणून हे आमच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असतात. विश्वचषकासारख्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. या स्पर्धेत आम्हाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही हे खरे असले तरी आम्ही एक पाऊल मागे टाकले आहे, असे म्हणता येणार नाही. मी याआधीही म्हणालो होतो की हा विश्वचषक आमचाच आहे आणि हा विश्वचषक अजूनही आमचा आहे असे मला वाटते, असे स्टोक्स म्हणाला.

- Advertisement -

इंग्लंडचे यापुढील सामने भारत आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध होणार आहेत. हे सामने जिंकण्यासाठी इंग्लंडला झुंज द्यावी लागेल हे खरे असली तरी हे दोन्ही सामने इंग्लंड जिंकू शकतो असे स्टोक्सला वाटते. याबाबत तो म्हणाला, आम्ही या दोन्ही सामन्यांत आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू. भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये आमची कामगिरी चांगली आहे. ते सध्या चांगल्या फॉर्मात असले तरी आम्ही परिस्थतीनुसार खेळ केला तर त्यांना पराभूत करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -