घरक्रीडाइंग्लंडच्या विजयावर दिग्गजांनी आयसीसीला विचारले प्रश्न

इंग्लंडच्या विजयावर दिग्गजांनी आयसीसीला विचारले प्रश्न

Subscribe

इंग्लंडच्या विजयावर दिग्गजांनी आयसीसीच्या निर्णयावर प्रश्न विचारले आहेत.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात रविवारी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळला गेला. हा सामना अत्यंत रोमहर्षक असा ठरला. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने शेवटच्या चेंडूत बरोबरीने धावा करत सामना टाय केला. त्यानंतर दोघांमध्ये सुपर ओव्हर खेळली गेली. ही सुपर ओव्हर देखील टाय झाली. परंतु, इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारल्यामुळे आयसीसीने इंग्लंडला विजयी घोषित केले. आयसीसीच्या याच निर्णयावर काही दिग्गजांनी प्रश्न विचारले आहेत.

दोन्ही संघ विजेते – गौतम गंभीर

आयसीसीने इंग्लंडला विजयी घोषित केल्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आयसीसीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतमने यासंदर्भात ट्विट केले असून म्हटले आहे की, ‘मला खरच कळत नाही की, जास्त चौकार मारल्यामुळे असे कसे कुणाला विजयी घोषित केले जाऊ शकते? हा सामना टाय व्हायला हवा होता. या रोमांचक सामन्यासाठी मी दोन्ही संघांचे अभिनंदन करतो. खरंतर दोन्ही संघ विजेत आहेत.’ याशिवाय न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने देखील आयसीसीवर टीका केली आहे. तर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी न्यूझीलंड संघाच्या पराभवावर हळहळ व्यक्त केली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – बेरीज कमी, वजाबाकी जादा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -