घरक्रीडाIPL 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यात CSK-KKR भिडणार, संघांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लेन...

IPL 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यात CSK-KKR भिडणार, संघांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र लेन मिळणार

Subscribe

आयपीएल 2022 च्या सामन्यांदरम्यान संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. पथकांच्या वाहतुकीसाठी रस्त्यावर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 55 सामने खेळवले जाणार आहेत.

नवी दिल्लीः IPL 2022 चा पहिला सामना 26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यात भिडतील. CSK चा संघ सध्या गतविजेता आहे. पहिला सामना नेहमीच गतविजेत्या संघाकडून खेळला जातो, त्यामुळे CSK ची निवड करण्यात आलीय, असंही आतापर्यंत पाहायला मिळालंय. दुसरीकडे कोलकाता शेवटच्या वेळेचा फायनलमध्ये पोहोचलेला संघ आहे, अशा परिस्थितीत आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात ज्या संघांनी आयपीएल 2021 ची अंतिम फेरी खेळली होती, तेच संघ भिडणार आहेत. यावेळी आयपीएलचे लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुण्यातच खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ आहेत आणि ते प्रत्येकी पाचच्या दोन गटांत विभागले गेलेत. जरी सर्व संघ आपापसात किमान एक सामना नक्कीच खेळतील.

इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएल 2022 च्या सामन्यांदरम्यान संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. पथकांच्या वाहतुकीसाठी रस्त्यावर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 55 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयने सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केलीय.

- Advertisement -

आयपीएलसाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला मदत करणार

महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला आयपीएल सामने आणि प्रशिक्षणाबाबत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याअंतर्गत संघांना स्वतंत्र रस्ता मार्ग देण्याचे सांगण्यात आले. एमसीएच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर म्हणाले की, बीसीसीआयसोबत 26 फेब्रुवारीला बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. नार्वेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देईल. मैदानात प्रेक्षकांच्या येण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

एका हॉटेलमध्ये दोन संघ थांबतील

महाराष्ट्र सरकार आयपीएल सामन्यांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात परवानगी देऊ शकते, असे समजते. त्याचवेळी बीसीसीआयने दोन संघांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी 10 संघ असल्याने संघांसाठी पाच पंचतारांकित हॉटेल्स बुक करावी लागणार आहेत. राज्य सरकार स्पर्धेतील बायो बबल आणि कोविड तपासणीमध्ये संघाला मदत करेल.

- Advertisement -

हेही वाचाः भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट 96 चेंडूंवर लिहिली गेली, दक्षिण आफ्रिकेने पहिला सराव सामना जिंकला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -