घरक्रीडाDavid Warner Retire : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, 'हा' ठरणार अखेरचा सामना

David Warner Retire : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, ‘हा’ ठरणार अखेरचा सामना

Subscribe

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसीने (ICC) अधिकृत वेबसाइटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. जानेवारी २०२४ मध्ये वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. याआधी वॉर्नर अॅशेस मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे.

वॉर्नर सध्या इंग्लंडमध्ये असून तो भारताविरुद्धच्या WTC finalची तयारी करत आहे. त्यानंतर वॉर्नर १६ जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेचा भाग असणार आहे. वॉर्नरचे आतापर्यंतचे टेस्ट करिअर उत्कृष्ट राहिले आहे. त्याने १०२ कसोटी सामन्यांमध्ये ८ हजार १५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान वॉर्नरने ३ द्विशतकं, २५ शतकं आणि ३४ अर्धशतकं झळकावली आहेत.

- Advertisement -

२०२४ चा टी-२० वर्ल्ड कप माझ्या करिअरचा शेवटचा सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि अॅशेस मालिकेनंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत मी शेवटच्या वेळी खेळणार आहे, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंडमधील बेकनहम येथे सराव करतोय. त्यावेळी वॉर्नरने देखील नेटमध्ये कसून सराव केला. पत्रकारांशी बोलताना वॉर्नरने आपल्या निवृत्तीचा प्लॅन सांगितला. मी कसोटी टेस्टमध्ये धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियात खेळत राहिलो तर मी नक्कीच वेस्ट इंडीज विरूद्धची मालिका खेळणार नाही, असंही वॉर्नर म्हणाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३३५ आहे. त्याने भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानसह अनेक मोठ्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे.


हेही वाचा : Wrestlers Protest: गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -