घरक्रीडाडे-नाईट टेस्ट केवळ कोलकात्यात होणार नाही!

डे-नाईट टेस्ट केवळ कोलकात्यात होणार नाही!

Subscribe

कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये झालेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. हा सामना केवळ तिसर्‍या दिवशीच संपला असला तरी ही भारतातील डे-नाईट कसोटीसाठी सकारात्मक सुरुवात होती असे मत वर्तवले जात आहे. हा सामना सुरळीत पार पडला याचे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला समाधान आहे. तसेच भारतात डे-नाईट कसोटी सामने केवळ कोलकात्यातच होणार नाहीत याचा त्याला विश्वास आहे.

भारताचा पहिला डे-नाईट सामना सुरळीत पार पडला याचे मला समाधान आहे. आम्हाला कसोटी क्रिकेटसाठी महत्त्वाची पावले उचलायची होती. त्यामुळे आम्ही या सामन्याचे आयोजन केले. ही ऐतिहासिक कसोटी यशस्वी व्हावी यासाठी आम्ही सामन्याआधी आणि सामन्यादरम्यान खूप गोष्टी केल्या. मला अजूनही भारत-ऑस्ट्रेलियामधील ईडनमध्ये झालेला २००१ सालचा कसोटी सामान आठवतो. त्या सामन्याला एका लाखांहुनही जास्त प्रेक्षक उपस्थित होते.

- Advertisement -

कोहली, रोहित, इशांतसारख्या महान खेळाडूंनी भरलेल्या स्टेडियममध्येच खेळले पाहिजे. या सामन्याला प्रेक्षक मोठ्या संख्येने आले याचा मला आनंद आहे. डे-नाईट सामने केवळ कोलकात्यात न होता, देशातील विविध भागांमध्ये होतील याचा मला विश्वास आहे. या सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळेल, असे गांगुली म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -