घरIPL 2020DC vs RCB : कागिसो रबाडा, नॉर्खियाने बंगळुरूला १५२ धावांवर

DC vs RCB : कागिसो रबाडा, नॉर्खियाने बंगळुरूला १५२ धावांवर

Subscribe

या सामन्यात विजेता होणारा संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल.

कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्खिया या दक्षिण आफ्रिकन तेज जोडगोळीच्या भेदक माऱ्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने (DC) आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) २० षटकांत ७ बाद १५२ अशा धावसंख्येवर रोखले. या सामन्यात विजेता होणारा संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल. पराभूत होणाऱ्या संघालाही प्ले-ऑफ गाठण्याची संधी असेल. मात्र, त्यांना मंगळवारी होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागेल. आजच्या सामन्यापूर्वी बंगळुरू आणि दिल्ली या दोन्ही संघांचे १३ सामन्यांत १४ गुण होते. हे दोन्ही संघ फॉर्मात नसून दिल्लीने मागील सलग चार, तर बंगळुरूने सलग तीन सामने गमावले होते.

आज अबू धाबी येथे होत असलेल्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बंगळुरूचे सलामीवीर जॉश फिलिपे आणि देवदत्त पडिक्कल यांनी डावाची सावध सुरुवात केली. त्यामुळे ४ षटकांनंतर बंगळुरूची बिनबाद २५ अशी धावसंख्या होती. मात्र, पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कागिसो रबाडाने फिलिपेला (१२) बाद केले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि पडिक्कल यांनी ५७ धावांची भागीदारी रचली. परंतु, अश्विनने कोहलीला (२९) बाद करत ही जोडी फोडली.

- Advertisement -

पडिक्कलने मात्र चांगली फलंदाजी सुरुवात ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, त्याचा ५० धावांवर नॉर्खियाने त्रिफळा उडवला. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये एबी डिव्हिलियर्स (३५) आणि शिवम दुबे (१७) यांनी फटकेबाजी केल्याने बंगळुरूने २० षटकांत ७ बाद १५२ अशी धावसंख्या केली. दिल्लीच्या नॉर्खियाने तीन आणि रबाडाने दोन विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -