घरक्रीडाqualifier 2 ipl 2021 : DC vs KKR " करो या मरोचा...

qualifier 2 ipl 2021 : DC vs KKR ” करो या मरोचा सामना “, गेमचेंजर खेळाडू कोण ठरणार ?

Subscribe

आयपीएल २०२१ चा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे, फायनल मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी आज कोलकत्ता विरूध्द दिल्ली अशी लढत होणार आहे. आजच्या सामन्यातील विजयी संघ फायनलच्या अंतिम लढतीसाठी सीएसके सोबत खेळणार आहे, तर पराभूत संघाचे चालू हंगामातील आव्हान संपुष्टात येईल, म्हणूनच आजचा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’चा असणार आहे. (DC vs KKR qualifier will decide which team is going to IPL 2021 final match )

केकेआर विरूध्द दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा क्वालिफायर सामना बुधवारी रात्री शारजाह मैदानात होणार आहे. दोन्ही संघाची या हंगामातील कामगिरी चांगली झाली आहे, जरी दिल्लीला आपल्या मागच्या सामन्यात सीएसके विरूध्द पराभव स्विकारावा लागला आहे. पण संघात असेही खेळाडू आहेत जे कधीही आक्रमक खेळी खेळून सामन्याची बाजू पलटू शकतात. दुसऱ्या बाजूला केकेआर आहे, त्यांनी आपल्या मागच्या सामन्यात आरसीबीचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे साहजिकच केकेआरचा आत्मविश्वास शिगेला पोहचलेला आहे. चालू हंगामात दोन्ही संघामध्ये १-१ असा सामना झाला होता. त्यात दोन्ही संघानी विजय मिळवला होता. भारतात खेळलेल्या सामन्यात दिल्लीने केकेआरचा पराभव केला होता, तर त्याच चालू हंगामात शारजाहच्या मैदानात झालेल्या सामन्यात केकेआरने दिल्लीचा पराभव केला होता.

- Advertisement -

दोन्ही संघातील सामन्यांमधील आकडेवारी –

दोन्ही संघात एकूण २८ सामने झाले आहेत ज्यात केकेआरला १५ सामन्यांत तर दिल्लीला १३ सामन्यांत विजय मिळवण्यात यश आले आहे. आता ह्या हंगामात तिसऱ्यांदा दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

हे खेळाडू ठरू शकतात दिल्लीसाठी ” गेमचेंजर’

दिल्ली कॅपिटल्ससाठी शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयश अय्यर यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ह्या तीनही खेळांडूंनी बुधवारी चांगले प्रदर्शन केले तर केकेआरसाठी धोक्याची घंटी निर्माण होऊ शकते. त्यासोबत ऋषभ पंतने सुध्दा आपले आक्रमक रूप धारण केले तरही ती दिल्लीसाठी जमेजी बाजू असणार आहे. फिरकीपट्टू अक्षर पटेल चांगल्या फॉर्म मध्ये पहायला मिळत आहे. तोही महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. सोबतच ऑलराउंडर शिमरॉन हेटमायर दिल्लीसाठी गेमचेंजर होऊ शकतो.

- Advertisement -

केकेआरचे ” हुकमी एक्के”

केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. ह्या दोन्ही सलामीवीरांकडून केकेआरच्या संघाला मोठी अपेक्षा असणार आहे. सोबतच ऑलराउंडर सुनिल नारायण संघासाठी गेमचेंजरची भूमिका निभावू शकतो. नारायणने आरसीबी विरूध्दच्या सामन्यात गेमचेंजरचे काम केले होते. नारायण सोबत शाकिब अल हसन आणि वरूण चक्रवर्ती संघाच्या जमेची बाजू असणार आहेत. आंद्रे रसेल दुखापतीतून ठिक झाला तर केकेआरसाठी “सोने पे सुहागा” असच होऊ शकते. रसेलला २६ सप्टेंबरला सीएसके विरूध्दच्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हा पासून तो संघातून बाहेर आहे. माहितीनुसार त्याची दुखापत अजून काहीशी ठिक झाली नाही. सामन्याच्या वेळीच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -