घरक्रीडाIND vs ENG : भारताला ४२० धावांचे लक्ष्य; इंग्लंडच्या दुसऱ्या डावात १७८ धावा 

IND vs ENG : भारताला ४२० धावांचे लक्ष्य; इंग्लंडच्या दुसऱ्या डावात १७८ धावा 

Subscribe

भारताकडून अश्विनने ६१ धावांत ६ विकेट घेतल्या. 

इंग्लंडने चेन्नई येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ४२० धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर आटोपला. इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स (०) आणि डॉम सिबली (१६) यांना भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने झटपट बाद केले. पहिल्या डावात द्विशतक करणाऱ्या कर्णधार जो रूटने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी केली. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ४० धावांची खेळी केल्यावर त्याला जसप्रीत बुमराहने पायचीत पकडले. पुढे ऑली पोप (२८), जॉस बटलर (२४) आणि डॉम बेस (२५) यांनी काही चांगले फटके मारल्याने इंग्लंडने दुसऱ्या डावात १७८ धावांची मजल मारली. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात ४२० धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून अश्विनने ६१ धावांत ६ विकेट घेतल्या.

वॉशिंग्टन सुंदरची अप्रतिम फलंदाजी

त्याआधी ५७८ धावांचे उत्तर देताना भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी भारताने ६ बाद २५७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अश्विनने ३१ धावा केल्यावर त्याला जॅक लिचने बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने अप्रतिम फलंदाजी करत १३८ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याला तळाच्या इतर फलंदाजांची साथ मात्र लाभली नाही. इंग्लंडकडून डॉम बेसने ४ विकेट घेतल्या.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -