घरक्रीडाIND vs AUS : फिट असो वा नसो, डेविड वॉर्नर तिसऱ्या कसोटीत खेळणारच! 

IND vs AUS : फिट असो वा नसो, डेविड वॉर्नर तिसऱ्या कसोटीत खेळणारच! 

Subscribe

तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारी या कालावधीत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर तिसऱ्या कसोटीपूर्वी पूर्णपणे फिट होईल अशी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला आशा आहे. परंतु, पूर्ण फिट नसतानाही वॉर्नरला तिसऱ्या कसोटीत खेळवण्याचा धोका पत्करण्यास ऑस्ट्रेलियन संघ तयार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डने सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारी या कालावधीत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पूर्णपणे फिट असेलच असे नाही. मैदानात उतरल्याशिवाय तो किती फिट आहे हे कळू शकणार नाही. प्रशिक्षक जस्टिन लँगर हे वॉर्नरशी संवाद साधतील. तो सामन्याआधी पूर्णपणे फिट होईल अशी त्याला आणि आम्हालाही आशा आहे. मात्र, तो ९०-९५ टक्के फिट असतानाही आम्ही त्याला सिडनी कसोटीत खेळवण्याचा धोका पत्करू शकतो, असे मॅकडोनाल्ड म्हणाला.

- Advertisement -

वॉर्नरला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानंतर झालेली टी-२० मालिका, तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत वॉर्नर खेळू शकला नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीसाठी त्याचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. तो विल पुकोवस्कीच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता असल्याचे मॅकडोनाल्डने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -