घरक्रीडा'या' पाकिस्तानी क्रिकेटरनं मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरनं मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

Subscribe

केवळ १८ इनिंग्जमध्येच फखरनं भारतीय कॅप्टन विराट कोहलीचा जलद १००० रन्सचा रेकॉर्ड तोडला आहे. याव्यतिरिक्त फखरनं इतरही काही रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

पाकिस्तानच्या २८ वर्षीय बॅट्समन फखर झमाननं विराट कोहलीचा वनडे मधील १००० रन्स करणारा जलद बॅट्समनचा रेकॉर्ड तोडला आहे. नुकतंच फखरनं झिम्बाम्ब्वेविरुद्ध वनडेमध्ये १५५ बॉल्समध्ये २१० रन्स काढून द्विशतकचा रेकॉर्ड केला होता. आता केवळ १८ इनिंग्जमध्येच फखरनं भारतीय कॅप्टन विराट कोहलीचा जलद १००० रन्सचा रेकॉर्ड तोडला आहे. याव्यतिरिक्त फखरनं इतरही काही रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. सुरुवातीपासून फखर पाकिस्तानकडून चांगला खेळाडू म्हणून चर्चेत होता. या रेकॉर्डमुळं वनडेमध्ये द्विशतक झळकवणारा पाकिस्तानचा पहिला तर जगभरातील सहावा बॅट्समन ठरला आहे.

- Advertisement -

रविवारी केवळ १८ इनिंग्जमध्ये रचला इतिहास

रविवारी फखरनं १८ व्या इनिंग्जमध्ये ८५ रन्स करून आपल्या १००० रन्स पूर्ण केल्या. यापूर्वी भारतीय कॅप्टन विराट कोहलीच्या नावे २४ इनिंग्जमध्ये १००० रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड तोडत फखरनं नवा इतिहास रचला आहे. तर यापूर्वी वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड्स, केविन पीटरसन, जॉनाथन ट्रॉट, पाकिस्तानच्या बाबर आजम आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन दी कॉक यांनीदेखील कमी इनिंग्जमध्ये १००० धावा पूर्ण करण्याचा इतिहास रचला होता. दरम्यान या सिरीजमध्ये फखरनं एकूण ५०५ रन्स काढल्या असून यामध्ये द्विशतकाचादेखील समावेश आहे. तर १८ वनडेमध्ये १८ इनिंग्ज खेळून एकूण १०६५ रन्स काढल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि १ अर्धशतकांचा समावेश आहे.

या सिरीजमध्ये फखरच्या नावे रेकॉर्ड

याशिवाय फखरनं अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. दोन वेळा आऊट होण्याच्या मधल्या वेळेत जास्त रन्स बनवण्याचा रेकॉर्डही त्यानं आपल्या नावे केला आहे. झिम्बाम्ब्वेच्या विरुद्ध पाच मॅचच्या सिरीजमध्ये दोन वेळा आऊट होण्याच्या मधल्या वेळेत त्यानं ४५५ रन्स बनवण्याचा रेकॉर्ड केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -