घरUncategorizedघाटकोपर दुर्घटनेतील जखमीवर शस्त्रक्रिया

घाटकोपर दुर्घटनेतील जखमीवर शस्त्रक्रिया

Subscribe

लोकांना वाचवण्यासाठी गेलेल्या प्रशांतला तेथील कंस्ट्रक्शन साईडवरील पत्रा पायात घुसल्यामुळे जबर दुखापत झाली आहे. त्याचा डावा पाय यात दुखावला गेला असून सध्या त्याच्या पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. उद्या त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

घाटकोपर विमान दुर्घटनेत जखमींना वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रशांत महाकाळवर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे.  गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हे विमान घाटकोपरच्या सर्वादय हॉस्पिटल परीसरात पडले. टीव्हीवर या दुर्घटनेची बातमी पाहिल्यानंतर जवळच राहणारा प्रशांत जखमींना वाचवण्यासाठी घराबाहेर पडला. घटनास्थळी कोणी अडकलं का? हे पाहत असताना त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते. पण, बघणाऱ्या लोकांना बाहेर काढत असताना त्याला कंट्रक्शन सुरू असलेल्या जागेतील पत्रा लागला. त्यात त्याच्या डाव्या पायाच्या तळव्याच्या हाडाला दुखापत झाली. त्यामुळे ते हाड जोडण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे प्रशांतचे काका नामदेव मोरे ‘माय महानगर’ला सांगितले.

 उद्या होणार शस्त्रक्रिया

लोकांना वाचवण्यासाठी गेलेल्या प्रशांतला तेथील कंस्ट्रक्शन साईडवरील पत्रा पायात घुसल्यामुळे जबर दुखापत झाली आहे. त्याचा डावा पाय यात दुखावला गेला असून सध्या त्याच्या पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. उद्या त्याच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. प्रशांतसोबत आणखी दोघे जण जखमी असून नरेश कुमार निशाद आणि लवकुश कुमार अशी त्यांची नावे आहेत. नरेश कुमार याचा चेहरा भाजला असल्यामुळे त्याला डोळे उघडता येत नाही. शिवाय त्याने दोन्ही हातही भाजले आहेत, असे नरेशच्या नातेवाईकांनी सांगितले.

- Advertisement -

आजच होता नोकरीचा पहिला दिवस

दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रशांतच्या नोकरीचा आजच पहिला दिवस होता. तो विप्रो कंपनीत कामाला लागला आहे. पण, या दुर्घटनेत जखमी झाल्याचे त्याच्या कामावर कळवण्यात आल्याचे असल्याचं प्रशांतचा भाऊ प्रदीप महाकाळ यांनी सांगितलं.

 जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी कामावर‌ होतो. मला संध्याकाळी ६.३० ला ही घटना कळली.  तिथल्याच काही लोकांनी अॅम्ब्युलन्समधून रुग्णाल

prashant mahakal
घाटकोपर दुर्घटनेतील जखमी प्रशांत महाकाळचा भाऊ प्रदीप महाकाळ

यात आणलं. आम्ही त्याला खासगी रुग्णालयात दाखल करणार होतो. पण आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करणार आहोत

-प्रदीप महाकाळ , प्रशांतचा भाऊ

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -