घरक्रीडाIPL 2022: ड्वेन ब्रावोनं रचला इतिहास; आयपीएलमध्ये ठरला सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू

IPL 2022: ड्वेन ब्रावोनं रचला इतिहास; आयपीएलमध्ये ठरला सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईचा दुसरा पराभव झाला आहे. लखनऊनं ६ गडी राखून सीएसकेचा पराभव करत चालू पर्वातील पहिला विजय मिळवला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईचा दुसरा पराभव झाला आहे. लखनऊनं ६ गडी राखून सीएसकेचा पराभव करत चालू पर्वातील पहिला विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या सामान्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोनं इतिहास रचला आहे. ड्वेन ब्रावो हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. तसंच, ब्रावोनं या काळात मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोनं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सातव्या सामन्यात आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. ड्वेनं ब्रावोनं लखनऊ संघाचा फलंदाज दीपक हुडा याला बाद करत मलिंगाचा १७० आयपीएल विकेट्सचा विक्रम मोडला.

- Advertisement -

१५३ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण १७१ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, लसिथ मलिंगाने १२२ सामन्यात १७० विकेट घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जशिवाय ब्रावो हा मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांमध्ये ३ भारतीय गोलंदाजांचाही समावेश आहे. या यादीत ब्राओ पहिल्या तर मलिंगा आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

गेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या अमित मिश्रानं १६६ विकेट्स घेतल्या आहेत, तर पियुष चावला याने १५७ विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. दिग्गज हरभजन सिंगच्या नावावर १५० आयपीएल विकेट आहेत.

- Advertisement -

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. तसंच, चालू मोसमातील पहिला विजय नोंदवला. चेन्नईनं दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुपर जायंट्स संघानं ३ चेंडू राखून ४ गडी गमावून विजय मिळवला. सीएसकेकडून सलामीवीर रॉबिन उथप्पाने ५० धावा केल्या तर शिवम दुबेने ४९ धावा केल्या. लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं सर्वाधिक ६१ धावा केल्या, तर एविन लुईसने नाबाद ५५ धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने ४० धावा केल्या.


हेही वाचा – Women’s World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक, या संघाशी होणार सामना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -