घरक्रीडाParam Vishisht Seva Medal 2022: सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा...

Param Vishisht Seva Medal 2022: सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पदक, ३८४ जणांना वीरता पुरस्कारची घोषणा

Subscribe

टोकियो ऑलम्पिक विजेता नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नीरज चोप्राला सन्मानित करण्यात येणार आहे. नीरज भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहे. आतापर्यंत नीरजला अनेक सन्मान मिळाले आहेत.

ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५७ मीटर अंतरावर भालाफेक करून पदक जिंकले आहेत. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने नीरजला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ३८४ जणांसाठी वीरता पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा मंडळ, ४ उत्तम युद्ध सेवा मंडळ, ५३ अति विशिष्ट सेवा मंडळ आणि १३ युद्ध सेवा मंडळाचा समावेश आहे.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंनी २६ जानेवारीपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायले आहे. तसेच यामध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताचे राष्ट्रगीत दाखवण्यात आले आहे. चोप्राने यूएसमध्ये प्रशिक्षणाला सुरूवात केली आहे. तसेच तो पुढची तयारी सुद्धा करत आहे. नीरज विश्व चॅम्पियनशिप डायमंड लीगमध्ये प्रतिस्पर्धा करणार आहे.


हेही वाचा : UP Assembly Election 2022: आरपीएन सिंह यांच्या हाती कमळ, अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -