घरक्रीडाडी कॉकची झुंजार खेळी!

डी कॉकची झुंजार खेळी!

Subscribe

क्विंटन डी कॉकने झुंजार खेळी करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ७२ षटकांत ७ बाद २४६ अशी धावसंख्या होती. या सामन्यात इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज सॅम करनने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले. त्याने चार फलंदाजांना माघारी पाठवले. त्याला स्टुअर्ट ब्रॉड (२ बळी) आणि जेम्स अँडरसन (१ बळी) या अनुभवी गोलंदाजांची उत्तम साथ लाभली.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अँडरसनने डीन एल्गरने माघारी पाठवले. यानंतर एडन मार्करम (२०), झुबेर हमझा (३९) आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिस (२९) काही काळ चांगली फलंदाजी करुन बाद झाले. त्यामुळे द.आफ्रिकेची ५ बाद १११ अशी अवस्था झाली.

- Advertisement -

मात्र, डी कॉक आणि पदार्पण करणारा प्रेटोरियस यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, करनने प्रेटोरियसला (३३) बाद करत ही जोडी फोडली. डी कॉकने मात्र अवघ्या ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने दोनशे धावांचा टप्पा पार केला. परंतु, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. १२८ चेंडूत १४ चौकारांसह ९५ धावा केल्यावर त्याला करननेच माघारी पाठवले. त्यामुळे ७२ षटकांत दक्षिण आफ्रिकेची ७ बाद २४६ अशी धावसंख्या होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -