घरक्रीडाGT vs RCB : मिलर-तेवातिया यांची तुफान फटकेबाजी, गुजरातचा बंगळुरुवर ६ विकेट्सने...

GT vs RCB : मिलर-तेवातिया यांची तुफान फटकेबाजी, गुजरातचा बंगळुरुवर ६ विकेट्सने विजय

Subscribe

गुजरात दिनी गुजरातचा आठवा विजय

डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया या डावखुऱ्या जोडीने ४० चेंडूत ७९ धावांची नाबाद भागी केल्यामुळे गुजरात टायटन्सने रॉयल चलेंजर्स बंगळूरूचा ६ विकेट्स आणि ३ चेंडू राखून पराभव करून आयपीएलमध्ये १६ गुणांसह आपला अव्वल क्रमांक कायम राखत बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला असून गुजरात दिनी (१ मे) आपली विजयी घोडदौड कायम राखली. राहुल तेवातियाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले त्याने २५ चेंडुत २ षटकार आणि ५ चौकारानिशी नाबाद ४३ धावा तडकावल्या. दक्षिण आफ्रिकन मिलरने एक षटकार आणि चार चौकारासह २४ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.

वृद्धिमान सहा आणि शुभमन गिल यानी १७१ धावांचे आव्हान स्वीकारताना गुजरातला अर्धशतकी सलामी करून दिली पण हसरंगाने सहाला (एक षटकार, चार चौकारासह २९) पाटीदारमार्फत झेलबाद करून सलामीची जोडी फोडली. गिलला (२८ चेंडूत ३१) शहाबाज अहमदने पायचीत पकडलं. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आज लवकर बाद झाला त्याने अवघ्या ३ धावा केल्यावर शहाबाज अहमदनेच त्याला झेलबाद केलं. साई सुदर्शन २० धावा केल्यावर बाद झाला तेव्हा गुजरातची अवस्था ४ बाद ९५ अशी झाली होती.

- Advertisement -

माजी कर्णधार विराट कोहलीला सूर गवसला त्याने यंदाच्या आयपीएल मधील पहिलेवहिले अर्धशतक झळकावताना रजत पाटीदारसह ७४ चेंडूत ९९ धावांची भागीदारी केल्यामुळे बंगळुरूने अव्वल क्रमांकावरील गुजरातसाठी १७१ धावांचे आव्हान उभं केलं आहे.

ब्रेबर्न स्टेडियमवर गर्दी करणाऱ्या २५ हजार क्रिकेटरसिकाना विराटने खूष केलं त्याची पत्नी अनुष्का देखील स्टेडियमवर हजर होती. डूप्लेसी झटपट बाद झाल्यावर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांची जोडी जमली त्यांनी संघांचे शतक फलकावर लावले कोहलीने ५३ चेंड्त ५८ धावा केल्या पण अखेरीस त्याची धावगती मंदावली. शमीच्या यॉर्करने विराटची उजवी यष्टी वाकवली. त्याने एक षटकार तसेच ६ चौकार लगावले. पाटीदारनेही विराटला तोला मोलाची साथ देताना ३२ चेंडूत ५२ धावा तडकावल्या. सांगवानने ही जमलेली जोडी फोडली. मॅक्सवेलने ३ षटकार २ चौकरांची आतषबाजी करत १८ चेंडूतच ३३ धावा फटकावल्या. तळाच्या महीपालने दांडपट्टा फिरवत ८ चेंडूत १६ धावा केल्यामुळे बंगळुरूने २० षटकांत ६ बाद १७० अशी मजल मारली. सांगवानने अचूक मारा करत १९ धावात २ मोहरे टिपले तर रशीद खान, शमी,जोसेफ अलझारी आणि फरग्युसन यानी एकेक विकेट काढली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -