2011 वर्ल्डकप धोनीने जिंकला? मग बाकी खेळाडू लस्सी पीत होते ? हरभजन सिंह भडकला

MSD dhoni

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंह हा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. भारताच्या २०११ सालच्या वर्ल्डकप विजयाच्या निमित्ताने हरभजन सिंह चर्चेत आला आहे. यावेळी त्याने थेट महेंद्र सिंह धोनीलाच टार्गेट केले आहे. हरभजन सिंह हा २०११ मधील भारताच्या विजयी टीमचा सदस्य होता. या विजयाचे श्रेय हे एकट्या धोनीला देणे अयोग्य असल्याचे म्हणत त्याने संपूर्ण संघातील ११ खेळाडू या वर्ल्डकप विजयासाठी योगदान देणारे होते, असे मत त्याने मांडले आहे. श्रीलंकेविरोधातील अंतिम सामन्यात २०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप भारतात आणण्याची किमया केली होती.

आयपीएल सामन्याच्या सुरूवातीच्या आधीच्या चर्चेत हरभजन सिंह याने केलेल्या वक्तव्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्याआधी झालेल्या चर्चेत एक वक्तव्य आता चर्चेत आले आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असताना २०२० मध्ये संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेतृत्व करत एक चांगल्या कर्णधाराचा आदर्श ठेवला होता. त्यावेळी विजय हवा असतानाही त्याच्या नेतृत्वात भावनाचां उद्रेक होऊ दिला नाही, असा उल्लेख मोहम्मद कैफने यावेळी केला. त्यावेळी हरभजन सिंह म्हणाला की, जेव्हा श्रेयसने टीमला अंतिम सामन्यापर्यंत नेले असे बोलले जाते, तेव्हा इतर खेळाडू विटी दांडू खेळत होते का ? हेच मला समजत नाही, असे हरभजन सिंह म्हणाला.

जेव्हा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकते तेव्हा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला असा बातमीचा मथळा असतो. जेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकतो तेव्हा बातमीचा मथळा असतो, की एम एस धोनीने वर्ल्ड कप जिंकला. बाकी दहा खेळाडू तिथे लस्सी प्यायला गेले होते का ? इतर दहा खेळाडूंनी त्या सामन्यात काय केले ? हा सांघिक खेळ आले. जेव्हा संघातील ७ ते ८ खेळाडू चांगली कामगिरी करतात तेव्हाच संघ जिंकतो असेही हरभजनने स्पष्ट केले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर धोनीने ९१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होती. षटकाराने भारतीय संघाने विजय मिळवला होता. भारताने २७५ धावांचा पाठलाग करताना गौतम गंभीरची ९७ धावांची सर्वात मोठी खेळी होती. भारताला सुरूवातीचा ३१ धावांवर २ खेळाडू बाद असा फटका बसलेला असतानाही गंभीरच्या खेळीने भारताच्या वर्ल्ड कप विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.