घरक्रीडाIPL 2021 : 'हे' तीन खेळाडू लिलावात राहणार अनसोल्ड?   

IPL 2021 : ‘हे’ तीन खेळाडू लिलावात राहणार अनसोल्ड?   

Subscribe

आगामी मोसमासाठीचा खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. मागील आठवड्यातच आठही फ्रेंचायझीनी काही खेळाडूंना रिटेन केले होते आणि काही खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला होता. संघाबाहेर करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या काही आघाडीच्या खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळे आता आयपीएलच्या १४ व्या मोसमासाठी होणाऱ्या खेळाडू लिलावात (Auction) या खेळाडूंना कोणता संघ खरेदी करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आगामी मोसमासाठीचा खेळाडू लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे. या खेळाडू लिलावात शिवम दुबे, पियुष चावला यांसारख्या भारतीय खेळाडूंना संघात घेण्यासाठीही फ्रेंचायझीस उत्सुक असतील. परंतु, भारताचे तीन अनुभवी खेळाडू मात्र ‘अनसोल्ड’ राहण्याची दाट शक्यता आहे.

हरभजन सिंग – भारताचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या मागील मोसमात खेळला नाही. त्यामुळे आगामी मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला पुन्हा करारबद्ध न करण्याचा निर्णय घेतला. हरभजनने त्याचा अखेरचा क्रिकेट सामना हा १२ मे २०१९ मध्ये खेळला होता. त्यामुळे तो आता दीड वर्षांहूनही अधिक काळ क्रिकेट खेळलेला नसून त्याला कोणताही संघ यंदाच्या खेळाडू लिलावात खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. त्याने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

- Advertisement -

केदार जाधव – अष्टपैलू केदार जादवने आयपीएलच्या मोसमात निराशाजनक खेळ केला. चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जाधवने ८ सामन्यांत केवळ ६२ धावा केल्या. त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. तसेच त्याला गोलंदाजीचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे चेन्नईच्या संघाने त्याला संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत जाधवने सलग दोन अर्धशतके केली. मात्र, त्याने आता भारतीय संघातील स्थान गमावले असून त्याला आयपीएलमध्येही पुन्हा संधी मिळणे अवघड वाटत आहे.

मुरली विजय – चेन्नई सुपर किंग्सने अनुभवी सलामीवीर मुरली विजयलाही रिटेन न करण्याचा निर्णय घेतला. विजयने २०१६ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना ४५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नसून त्याला फारसे सामने खेळण्याची संधीही मिळालेली नाही. २०१७ आयपीएल स्पर्धेत तो एकही सामना खेळला नाही. तर २०१८ मोसमात एक सामना, २०१९ मोसमात दोन सामने आणि २०२० मोसमात तो केवळ तीन सामने खेळला. या सर्व गोष्टी लक्षात घेता यंदाच्या लिलावात तो अनसोल्ड राहू शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – AUS vs NZ : भारतीय टॅक्सी चालकाचा मुलगा ऑस्ट्रेलियाच्या ‘संघा’त!


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -