घरक्रीडाWomens Big Bash League : हरमनप्रीत कौर बनली 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट;...

Womens Big Bash League : हरमनप्रीत कौर बनली ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट; हा विक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू आणि टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बीग बॅश लीग स्पर्धेतील मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू आणि टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बीग बॅश लीग स्पर्धेतील मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे. मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळणारी हरमनप्रीत पहिली भारतीय खेळाडू आहे जिने हा किताब पटकावला आहे. तर या लीगमध्ये मालिकावीर म्हणून सन्मानित होणाऱ्यांपैकी ती तिसरी बिगर ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे जिने हा कारनामा केला आहे. तिच्या आधी न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईन, एमी सॅटरवेटने हे विजेतेपद पटकावले होते. हंगामातील मेलबर्नचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला आहे. हरमनप्रीत मेलबर्न रेनेगेड्सच्या संघात समाविष्ट होणारी फक्त दोन आंतरराष्ट्रीय खेळांडूमधील एक आहे. ऑस्ट्रेलियाकडून सोमवारीच टूर्नामेंटच्या सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा करण्यात आली होती.

हरमनप्रीतने या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही बाजूंनी शानदार प्रदर्शन करून मेलबर्नच्या संघाला अधिक मजबूत केले. तिने ११ डावात ६६.५ च्या सरासरीनुसार तीन अर्धशतकांच्या जोरावर ३९९ धावा केल्या. तिची सर्वश्रेष्ठ धावसंख्या ८१ आहे ही धावसंख्या तिने सिडनी थंडरच्या संघाविरूध्द खेळताना केली. दरम्यान हरमनप्रीतने आक्रमक फलंदाजी करताना १८ षटकार ३२ आणि चौकार मारले आहेत. मेलबर्नच्या संघाची स्टार फिरकीपटू जॉर्जिया वेअरहॅमला दुखापत झाल्यानंतर संघाच्या गोलंदाजीची देखील कमान सांभाळली होती. तिने गोलंदाजी करताना एकूण १५ बळी पटकावले आहेत.

- Advertisement -

तीनवेळा ठरली सामनावीर

हरमनप्रीतला या हंगामात तीनवेळा सामनावीर घोषित करण्यात आले होते. तिने बेथ मुनी आणि सोफी डेव्हाईन यांना मागे टाकत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचे विजेतेपद पटकावले आहे. हा किताब जिंकल्यानंतर तिने सांगितले की, “मला आशा आहे की लवकरच आयपीएल देखील सुरू होईल. जिथे भारतीय महिला खेळाडू आपली प्रतिभा दाखवू शकतील”.


हे ही वाचा: Indonesia Open : पी.व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; चुरशीच्या लढतीत जपानच्या ओहोरीचा केला पराभव

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -